Heart Attack during exercise Video : जिममध्ये (gym Video) व्यायाम करत असताना दोन सेलेब्रिटींना हृदयविकाराचा झटका (Celebrities have heart attacks) आला आणि त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. गेल्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये राजू श्रीवास्तव (Raju Srivastava), सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Veer Suryavanshi) यांनी जगाचा निरोप घेतला. नवीन वर्षाला 2023 ला सुरुवात झाली आहे. मात्र व्यायामादरम्यान हृदयविकाराचा झटका (Heart Attack Video) येण्याची अनेक प्रकरणे अजूनही समोर येतं आहे. शेवटी कसं आहे जिममध्ये जाणाऱ्या लोकांचं हृदय कमजोर असतं का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण हॉटेल मालक आणि एका डॉक्टराचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore in Madhya Pradesh News) एका व्यक्तीचा गुरुवारी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. इंदूरमधील स्कीम क्रमांक 78 परिसरात एका हॉटेल मालकाचा व्यायाम करत असताना अचानक यमराजाने गाठलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा माणूस ट्रेडमिल केल्यानंतर तो जॅकेट काढताना दिसतं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याला चक्कर येऊ लागली आणि त्याने जवळच ठेवलेल्या टेबलाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण तो कोसळला. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या काही तरुणांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दुसरी घटना लखनऊमधील (Lucknow news) विकास नगरमध्ये शुक्रवारी घडली आहे. या घटनेत जिममध्ये वर्कआउट करत असताना डॉक्टराला गरगऱ्याला लागलं आणि तो अचानक मशीनखाली पडला. जिममधील प्रशिक्षकाने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने काही हालचाल केली नाही. अशा परिस्थिती त्या डॉक्टरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. डॉक्टर संजीव पाल असं त्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. पाल यांना हृदयचा त्रास होतो. काही काळापूर्वी त्यांच्यावर बायपास सर्जरीही करण्यात आली होती. (Live Heart Attack during exercise and heart attack at gym Video Viral and trending on Social media marathi news)
हृदयविकाराचा झटका येणं म्हणजे नेमकं काय होतं. तर जेव्हा आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण होतो. अशावेळी व्यक्तीच्या छातीत तीव्र वेदना होतात यालाच हृदयविकाराच झटका येणं असं म्हणतात.
जिम में वर्कआउट के दौरान हार्ट अटैक के मामले देशभर में बढ़ते जा रहे है, ऐसा ही एक मामला इंदौर से सामना आया है। यहां एक होटल संचालक की जिम में हार्ट अटैक से मौत हो गई, कैमरे में कैद हुआ शॉकिंग मंजर।#Indore #latestnews #lucknowkibaat32 pic.twitter.com/oXOj4LHDyO
— लखनऊ की बात (@Lucknowkibaat32) January 5, 2023
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वर्कआउट किंवा व्यायाम करताना हृदयविकाराची लक्षणे शरीरात दिसत नाहीत. व्यायामादरम्यान शरीरात ऑक्सिजनची मागणी खूप वाढते आणि अशा स्थितीत हृदयाला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. या कारणास्तव, वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा धोका वाढतो.