नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीत पार्टीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार करणार नाहीत.
गुजरात येथील आप नेते गोपाल राय यांनी शुक्रवारी सांगितले की, केजरीवाल गुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत.
गुजरात निवडणुकीत आप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी घरोघरी जाऊन मत मागण्याची रणनीती आखली आहे.
त्यामूळे राष्ट्रीय नेत्याला स्टार प्रचारक म्हणून रस्त्यावर आणण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांचा असलेला जनसंपर्क हाच प्रचाराचा आधार बनविला आहे.
या निवडणुकीत १८२ जागांवर लढण्यापेक्षा निवडक जागांवर उमेदवार उभे करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
सामाजिक आणि इतर निवडणूकीची गणित जुळून येतात तिथेच उमेदवार लढणार आहेत.
यानुसार आम आदमीने ३३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पार्टीकडून तीन सूची जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीचे केंद्रीय नेते कुमार विश्वास यांच्यासहित काही असंतुष्ट नेत्यांच्या नाराजीतून वाचण्यासाठी स्टार प्रचारकांना गुजरातमध्ये आणले नाही.
त्याऐवजी जनसंपर्कावर जोर देण्यावर आपने भर दिला आहे.