भरधाव ऍम्ब्युलन्सला टोलनाक्यावर अपघात! थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO

अनेकांचे जीव वाचवणाऱ्या ऍम्ब्युलन्सचाच टोलनाक्यावर भीषण अपघात

Updated: Jul 20, 2022, 08:36 PM IST
भरधाव ऍम्ब्युलन्सला टोलनाक्यावर अपघात! थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO title=

Ambulance Accident: कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुका परिसरात टोल प्लाझाजवळ एम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंगाचा थरकाप उडेल असा हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

अपघात सीसीटीव्हीत कैद
आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो, एक ऍम्ब्युलन्स भरधाव वेगात टोलनाक्याच्या दिशेनं येते. टोलनाक्यावरील व्यक्ती ऍम्ब्युलन्सला रस्ता करून देण्यासाठी बॅरेकेट्स बाजुला करते. मात्र त्याचवेळी ऍम्ब्ल्युलन्स चालकाचं नियंत्रण सुटतं ही ऍम्ब्युलन्स थेट टोल नाक्याला धडकते. 

एम्ब्युलन्सचा वेग प्रचंड असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. चालकाने टोलनाक्यावरील लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले पण जमिनीवर साचलेल्या पाण्यामुळे टायर घसरून ऍम्ब्युलन्स उलटली. त्यामुळे ऍम्ब्युलन्समधली लोकं अक्षरश: बाहेर फेकली गेली.