स्मरणशक्ती आणि मनाची एकाग्रता वाढवतात 'या' 4 औषधी, आयुर्वेदात सांगितलंय महत्त्व!

Ayurvedic Herbs For Brain:मेंदू तल्लख होण्यासाठी किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी आयुर्वेदातच काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळं तुम्ही तणावमुक्त होऊ शकाल.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 10:49 AM IST
स्मरणशक्ती आणि मनाची एकाग्रता वाढवतात 'या' 4 औषधी, आयुर्वेदात सांगितलंय महत्त्व! title=
health tips in marathi ayurvedic Herbs to boost brain function and improve memory

Brain Superfoods: आजच्या धकाधकीच्या काळात मेंदु तल्लख ठेवणे आणि स्मरणशक्ती वाढवणे हे खूप आव्हानात्मक झाले आहे. ताण-तणाव, नैराश्य, खाण्या-पिण्याच्या सवयी, झोप यामुळं मेंदुवर ताण येतो. अशावेळी कामात लक्ष न लागणे, सतत गोष्टी विसरणे अशा घटना घडतात. पण काळजी करु नका. यावरही आयुर्वेदात उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदात अशा अनेक जडीबुटी आहेत ज्या मेंदु तल्लख ठेवण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहेत. अशा कोणत्या जटीबुटी आहेत हे जाणून घेऊया. 

अश्वगंधा

अश्वगंधाला आयुर्वेदात 'सौंधिया' असेही म्हणतात. ही एक उपयुक्त आणि  औषधी वनस्पती आहे जी तणाव कमी करते, मन शांत करते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. अश्वगंधा मेंदूच्या पेशींचे पोषण करते आणि त्यांची कार्य क्षमता वाढवते.

ब्राह्मी

ब्राह्मी ही मेंदूसाठी खूप फायदेशीर औषधी वनस्पती आहे. ब्राह्मी मेंदूच्या पेशींमधील रक्तप्रवाह सुधारते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. तसेच, यामुळे तणाव कमी होतो आणि चिंता दूर राहते. ताण-तणाव कमी झाल्यामुळं नैराश्यही कमी होते. 

शंखपुष्पी

शंखपुष्पीला 'कणेर' नावानेही ओळखले जाते. मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी आयुर्वेदातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींपैकी शंखपुष्पी एक आहे. शंखपुष्पी मेंदूची कार्यक्षमता वाढवते, स्मरणशक्ती मजबूत करते आणि शिकवलेल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी एकाग्रता वाढवते.

गिलोय

गिलॉयला'अमृतवेल' म्हणूनही ओळखले जाते. ही एक औषधी वनस्पती आहे जी मेंदूसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. गिलॉय मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते. याशिवाय मनाला तणावमुक्त ठेवण्यासही मदत करते.

कसे सेवन कराल?

या औषधी वनस्पतींचे सेवन पावडर,चुर्ण किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात केले जाऊ शकतात. मात्र कोणत्याही औषधी वनस्पती वापरण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे वय, शारीरिक स्थिती आणि गरजेनुसार डॉक्टर तुम्हाला योग्य प्रमाणात डोस वापरण्याची पद्धत सांगतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)