‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका संपताच अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट; म्हणाला, 'अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर...'

Abhijeet Khandkekar Gets Emotional as Tujhech Mi Geet Gaat Aahe Serial Ends : अभिजीत खांडकेकरनं ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका संपताच शेअर केली भावूक पोस्ट...

दिक्षा पाटील | Updated: Jun 16, 2024, 04:15 PM IST
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका संपताच अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट; म्हणाला, 'अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर...' title=
(Photo Credit : Social Media)

Abhijeet Khandkekar Gets Emotional as Tujhech Mi Geet Gaat Aahe Serial Ends : गेल्या दोन वर्षांपासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत इतकावेळ काम केल्यानंतर सगळ्यांचं कुटुंबासारखं वातावरण तयार झालं आहे. अशात त्यांना रोज एकमेकांची सवय झाल्यानंतर आता मालिकेचा आज शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार. यात अभिनेता अभिजीत खांडकेकरनं एक पोस्ट शेअर केली आहे. तर इतक्या दिवसांचा प्रवास सांगत अभिजीत हा भावूक झाला आहे. 

अभिजीतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की, 'अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय… प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही. 'ए तू किती वाजता उद्या?', 'आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा.., च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप, चलो चलो जल्दी घर जाना है…, हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही. आता हा चॅप्टर संपवून नविन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो… पण आम्हा कलाकारांचं हे असच असतं… तरीही तुझेचच्या निमित्तानं तयार झालेलं हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूनं मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेनं आई सारखी माया दिली. सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर ,अभिजीत च्या रूपात भाऊ भेटले. पल्लवी सारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली, प्रिया , तेजस्विनी, उर्मिला सारख्या आयुष्यभराच्या मैत्रीणी... प्रत्येकाबद्दल भरपूर लिहीता येईल… पण ते लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल… सतिश राजवाडे सर, अजिंक्य , मधूरा , महिपाल जी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई , संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीम चे मनापासून आभार. रसिक प्रेक्षकांना दंडवत .. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही. 'तुझेच मी गीत गात आहे ‘ च्या निमित्तानं वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’ च्या निमित्तानं प्रसारीत होतोय याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भुमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : संजय दत्त बागेश्वर बाबांची भेट घेतल्यानंतर म्हणाला, 'ही जागा कमाल आहे मी...'

या मालिकेविषयी बोलायचं झालं तर त्यात अभिजीत खांडकेकरशिवाय उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, उमेश बने, पल्लवी वैद्य, शैलेश दातार हे कलाकार आहेत.