Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार सांगलीच्या जत मध्ये समोर आला आहे, सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारा बद्दल जतचे आमदार विक्रम सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. एका बाजूला कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांना अन्याय होत असल्याची भावना असताना, आता महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जाते का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे
सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार शिक्षक नियुक्ती कारभारात समोर आला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदे कडून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र धक्कादायक बाब म्हणजे जत तालुक्यातल्या कन्नड व उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे
कर्नाटकच्या सीमेवर जत तालुका असल्याने या ठिकाणी कन्नड भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून जवळपास 132 कन्नड माध्यमिक शाळा चालवल्या जात आहेत.अनेक शाळांमध्ये शिक्षक पद हे रिक्त आहेत. त्यामुळे नुकताच जिल्हा परिषदेकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 274 शिक्षक नियुक्ती करण्यात आल्या आहेत
कन्नड शाळा आणि कन्नड विद्यार्थी या ठिकाणी कन्नड माध्यमिक मधील शिक्षक असणे गरजेचे आहे तर मराठी माध्यमातून शिक्षक इथे नियुक्त करण्यात आले तर कन्नड शाळेतल्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शाळेतल्या शिक्षक कोणते धडे देणार हा प्रश्न आहे ?
सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकार हा कन्नड भाषिकांच्यावर अन्याय करणारा असल्याची भावना आता सीमा भागात कन्नड भाषिकांमध्ये निर्माण झाली आहे,त्यामुळे राज्याचे शिक्षण विभाग आता कन्नड भाषीकांच्यावर होणार अन्याय दूर करणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस नाट्यमय घडामोडी घडत आहेत.. शिक्षकांच्या टिडीएफ संघटनेच्या नगर जिल्हा आघाडीने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.. शिर्डी येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.. टिडीएफ संघटनेच्या पाठिंब्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांना मोठे पाठबळ मिळताना दिसतंय..