चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 10:44 AM IST
चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो? title=
Ghee Roti or tup chapati is Good for Health know the healthy benefits

Ghee and Roti Benefits: आपल्या आई व आजीच्या काळात जेवणात तुपाचाच जास्त वापर केला जायचा. काही ठिकाणी तर चपातीवरदेखील तुप लावून दिले जायचे. गरमा गरम चपात्यांवर तूप लावून खाल्ल्याने चपातीची चव तर वाढतेच पण आरोग्यासाठीही पौष्टिक मानली जायची. मात्र, आजकाल खूप कमी जण चपातीला तूप लावून खातात. आजची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळं खाण्यावरही बंधंन आली आहेत. कोलेस्ट्रॉल वाढेल याभितीने जेवणातही तेला-तुपाचे प्रमाण बेतानेच घेतले जाते. तसंच, लठ्ठपणा वाढू नये म्हणूनची तुप-तेलाचे प्रमाण कमी घेतले जाते. पण अशावेळी चपातीवर तुप लावून खावे का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.

भारतात पूर्वीच्या काळी दुधापासून बनवलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. दही, लोणी, खवा, तूप हे पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जात होती. त्यातीलच एक आहे ते तूप. लोणी गरम करुन त्याच्यापासून तूप कढवले जाते. भारतात त्याचा वापर तेलाच्या ऐवजी केला जायचा. चपाती, डाळ,पराठा किंवा गोड पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जायचा. तुप फक्त खाण्यापुरतेच नव्हे तर औषधी गुणांसाठीही फायदेशीर आहे. त्वचेसाठीही तुप फायदेशीर आहे. मात्र, गरजेपेक्षा जास्त तुपाचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणामदेखील होतात.

चपातीला तूप लावून खावे का?

आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात चपातीला तूप लावून याचे सेवन करता तेव्हा तब्येतही चांगली चांगली राहते. चपातीला तूप लावून सकाळी सकाळी तुम्ही खाल्ले तर दिवसभर तुमचं पोट भरलेलं राहील. मात्र अतिप्रमाणात तूप खावू नये.

तूप खाण्याचे फायदे

ऊर्जेचा स्त्रोतः तुपातील हेल्दी फॅट्स शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

त्वचेचे आरोग्यः तूप खाल्ल्याने त्वचा सुधारते आणि त्वचा मुलायम होते.

सांधे आणि हाडांसाठीः तुपात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात.

मेंदूसाठी फायदेशीरः तुपात असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड मेंदूची कार्यक्षमता वाढवते.

तूप खाण्याचे तोटे

वजन वाढणेः जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन वाढू शकते कारण त्यात जास्त कॅलरीज असतात.

कोलेस्ट्रॉल वाढतेः तुपाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

हृदयाशी संबंधित समस्याः जर तुप जास्त प्रमाणात सेवन केले तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

पचनाच्या समस्याः काही लोकांना तूप खाल्ल्यानंतर अपचन, गॅस किंवा पोटाच्या इतर समस्या असू शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24
TAAS त्याची पुष्टी करत नाही.)