Jharkhand: CM हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित व्यक्तीवर ED चा छापा, AK 47 जप्त

झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, 17 ठिकाणी ईडीचा छापा  

Updated: Aug 24, 2022, 03:06 PM IST
Jharkhand: CM हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित व्यक्तीवर ED चा छापा,  AK 47 जप्त title=

ED Raid in Illegal Mining Case: अवैध खाण घोटाळ्याप्रकरणी ईडीनं झारखंडची राजधानी रांचीमध्ये 17 ठिकाणी छापे मारलेत. ईडीने ज्या ठिकाणी छापे घातले ते प्रेम प्रकाश (Prem Prakash) नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहेत.  विशेंष म्हणजे प्रेम प्रकाश यांचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ( Jharkhand CM Hemant Soren) यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत.

प्रेम प्रकाश यांच्या घरातून एके-47 आणि दोन रायफलही जप्त करण्यात आलीये. प्रेम प्रकाश हे अनेक बड्या नेत्यांच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची कागदपत्रही जप्त
छाप्यात काही महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आलाची माहिती आहे. ईडीने रांचीतल्या अरगोडा चौकाजवळच्या समीप वसूंधरा अपार्टमेंटमधलं प्रेम प्रकाश यांचं कार्यालय, ओल्ड एजी कॉलनी इथली शाळा आणि अरगोडा चौक इथे व्यावसायीक एम के झा यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. रांचीतल्या 12 ठिकाणांशिवाय तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतल्या सहा ठिकाणांवरही छापा सुरु आहे.

ईडीला मिळाली होती माहिती
मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्षातील आमदार पंकज मिश्रा यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्या चौकशीदरम्यान तपास यंत्रणेला महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारावर बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली.

याआधीही झाली होती कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार 25 मे रोजी ईडिने प्रेम प्रकाश आणि आणखी एका व्यवसायीकाच्या पाच ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. यात काही महत्त्वाची कागदपत्र आणि किमती सामान जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणी प्रेम प्रकाश यांची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. 

झारखंडच्या वरिष्ठ IAS पूजा सिंघल आणि तिच्या सहकाऱ्यांच्या दोन डझन ठिकाणी छापे टाकल्यानंतर, ईडीने झारखंडमध्ये 100 कोटींहून अधिक रुपयांचा खाण घोटाळा उघडकीस आणला होता. ईडीने आता टाकलेल्या छाप्यांचाही या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे.