Reasi Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी भाविकांच्या एका बसवर दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाला. या हल्ल्यात 10 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या संघटनेने घेतली आहे. ही संघटना पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदआणि लष्कर-ए-तोयबाच्या इशाऱ्यावर काम करते. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून सोशल मीडियावरही युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अजिंक्य रहाणेच्या पत्नीचं ट्विट
टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने (Radhika Rahane) या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला आहे. याबरोबरच तीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या ट्विटवर युजर्सने राधिकाचं कौतुक केलं. रियासी दहशतवादी हल्ल्यावर खूपच कमी सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राधीका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चांगल्या-वाईट घटनांवर ती आपलं मतही मांडते.
युजर्सकडून रितीका ट्रोल
राधिकाच्या पोस्टनंतर युजर्सकडून रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) ट्रोल होतेय. युजर्सकडून रितीकाची जुनी पोस्ट शोधली जात आहे. रितीका सध्या अमेरिकेत आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे सामने पाहण्यासाठी ती स्टेडिअममध्ये उपस्थित असते. भारत-पाकिस्तान सामन्यावेळी रितीका स्टेडिअमध्ये दिसली होती. दरम्यान रितीकाने गाजा शहरातील राफा हल्ल्यावर पोस्ट शेअर केली होती. आता जम्मूमधील रियासी हल्ल्यावर तीने पोस्ट केली का असा सवाल युजर्सकडून विचारला जातोय.
Wife of Rohit Sharma vs Wife of Ajinkya Rahane pic.twitter.com/1f8lpOt5pi
— Hindutva Knight (@HPhobiaWatch) June 10, 2024
वैष्णवदेवीला जात होती भाविकांची बस
जम्मू-काश्मिरमधल्या रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. उत्तर प्रदेशमल्या भाविकांना घेऊन ही बस वैष्णव देवीला जात होती. गोळीबारानंतर बस खोल दरीत कोसळली. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस शिव खोडी मंदिराकडून कटरा इथल्या वैष्णव देवी मंदिराकडे जात होती. यावेळी रियासी जिल्ह्यातील तेरयाथ गावाजवळ संध्याकाळी सव्वासहाच्या आसपास बसवर दहशतवाद्यांनी हल्लाकेला. या बसमध्ये एकूण 53 प्रवासी होते.
बॉलिवूड स्टार्सही ट्रोल
राफा हल्ल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपल्या स्टोरीवर 'ऑल आईज ऑन राफा' स्टेटस ठेवलं होतं. पण आता जम्मूमधल्या रियासी दहशतवादी हल्ल्यानंतर या सेलिब्रेटींकडून एकही शब्दाची पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. या स्टार्समध्ये माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, कंगना रनौत, अनुमप खेरसह अनेकांचा समावेश होता. यामुळे सोशल मीडियावर या बॉलिवूड स्टार्सवर संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक स्टार्सने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर राफा हल्ल्याचा निषेध केला होता. आता रियासी हल्ल्यानंतर हे सेलिब्रेटी गप्प का असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे.