Indian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल

Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package   

सायली पाटील | Updated: Apr 28, 2023, 09:56 AM IST
Indian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल  title=
IRCTC Tour Package 2023 Indian Railway tour package for Char Dham Yatra Know Fair Route Dates in Marathi

IRCTC Tour Package: भारतात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेनंही महत्त्वाची भूमिका निभवाल्याचं पाहायला मिळतं. कारण, धार्मिक स्थळांपर्यंत प्रवासी भाविकांना पोहोचवण्यासाठी वेळोवेळी रेल्वे विभागाकडून काही खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. किंबहुना रेल्वेचं हे योगदाना अद्यापही सुरुच आहे. कारण आता थेट चारधाम यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या मदतीला रेल्वे पोहोचली आहे. 

काही दिवसांपूर्वीच गंगोत्री (Gangotri), यमुनोत्री (Yamunotri), केदारनाथ (Kedarnath) आणि आता बद्रीनाथ (Badrinath) अशी चारही धामांची कवाडं भाविकांसाठी खुली करण्यात आली आणि मोठ्या उत्साहात यंदाच्या वर्षीच्या चारधाम यात्रेची सुरुवात झाली. यात्रेसाठीच्या नोंदणीची सुरुवातही काही दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे. त्यातच आता रेल्वे विभागाकडूनही भाविकांना काही कमाल Offer देण्यात येत असल्याचं कळत आहे. 

हेसुद्धा वाचा : 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच

Chardham Yatra साठी IRCTC नं नुकतीच टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत भाविक प्रवाशांना बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाळी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री अशा स्थळी जाण्याची संधी मिळेल. 11 रात्री आणि 12 दिवसांचा कालावधी असणारी ही सफर 21 मे 2023 रोजी सुरु होणार आहे. 21 मे ते 25 जून दरम्यानच्या काळात ही टूर रेल्वे विभागाकडून नेण्यात येणार आहे. जिथं प्रवाशांना सहा वेगवेगळ्या तारख्यांच्या विमान तिकिटांचे पर्याय असतील. त्यामुळं सोयीनुसार प्रवासी त्यांच्या यात्रेची तारीख निवडू शकतात. 

सध्याच्या घडीला रेल्वेकडून देण्यात आलेल्या तारखा खालीलप्रमाणं... 

18 जून ते 29 जून 
11 जून ते 22 जून 
4 जून ते 15 जून 
28 मे ते 8 जून 
21 मे ते 1 जून 

यात्रेसाठी किती रुपये मोजावे लागणार? 

रेल्वे विभागाकडून आखण्यात आलेल्या या टूरसाठी ट्रिपल ऑक्यूपंसीसाठी एका व्यक्तीचा खर्च 67000 रुपये इतका असेल. सिंगल प्रवाशांसाठी 91,400 रुपये आणि Couple साठी 69,900 रुपये असेल. तिघांना जायचं झाल्यास 91400 रुपये भरावे लागतील. 

रेल्वे विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या या रकमेमध्ये प्रवाशांना मुंबईतून येण्याजाण्याचा हवाई खर्च, 11 रात्रींसाठी हॉटेल अथवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय, वातानुकुलित वाहनांनी पर्यटनस्थळांची भ्रमंती, नाश्ता आणि रात्रीचं जेवण अशा सुविधा दिल्या जातील. irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळावर या टूर पॅकेजविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल.