मुंबई : Investment saving tips: तुम्हाला करोडपती व्हायचे आहे. तर नोकरी लागताच महत्वाचे काम आधी करा. त्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल. प्रत्येकाचं मोठे स्वप्न असते. गरीब किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीला आपण करोडपती व्हावे, असे वाटत असते, परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात फार कमी लोक सक्षम असतात. मात्र, योग्यवेळी योग्य नियोजन करून बचत आणि गुंतवणूक केली तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचा उपाय करायला पाहिजे. येत्या 10 वर्षात तुम्ही करोडपती व्हाल.
मार्केट आणि गुंतवणूक तज्ज्ञांनी करोडपती बनण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. म्हणजेच गुंतवणुकीला (Investment) शिस्तीचा भाग बनवा. पार्टी किंवा मित्रांवर पैसे उधळण्याऐवजी तुमचा पहिला पगार योग्य ठिकाणी गुंतवा. दीर्घ मुदतीत मोठी रक्कम मिळवण्यासाठी पहिल्या पगारातूनच त्यातील काही भाग बाजूला ठेवा. खर्चाच्या बाबतीत आवश्यक ती खबरदारी घ्या आणि अगदी आवश्यक असेल तेव्हाच पगार मोठ्या प्रमाणात खर्च करा. म्हणजेच, आवश्यक खर्च केल्यानंतर, पगाराचा काही भाग शिल्लक राहतो. योग्यरित्या निवडलेल्या इक्विटी आणि शिल्लक निधीतून SIP सुरु करा.
SIP मध्ये चांगल्या परताव्यासाठी योग्य फंडाची निवड करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंड किंवा सुमारे 10 वर्षांच्या कालावधीसह इतर गुंतवणूक खूप उपयुक्त ठरु शकतात. यासाठी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घेता येईल. श्रीमंत होण्याचे दोन साधे आणि सोपे सीक्रेट म्हणजे 'लवकर गुंतवणूक करणे सुरू करा' आणि 'नियमितपणे गुंतवणूक करा'.
एका ठराविक कालावधीत करोडपती होण्याच्या प्रश्नावर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दरमहा 40 ते 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 10 वर्षांत एकूण गुंतवणूक सुमारे 50 लाख रुपये होईल. यावर तुम्हाला मिळणारा परतावा जरी 11 टक्के असला तरी 10 वर्षात तुमची गुंतवणूक सहज 1 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. त्याच वेळी, 12 टक्के चक्रवाढ व्याजानुसार, 10 वर्षांत ते 1 कोटी रुपयांपेक्षा कमी होणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मोठ्या प्रमाणात रक्कम तयार करण्यासाठी शिस्तीने केलेली गुंतवणूक श्रीमंत बनवण्यासाठी सर्वात प्रभावी आहे, ज्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता मोठी भूमिका बजावते.