मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र 'वाघा'ने उचलून नेल्याचा आरोप!

Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे. 

Updated: Aug 12, 2022, 10:38 AM IST
मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र 'वाघा'ने उचलून नेल्याचा आरोप! title=

बहराइच, उत्तर प्रदेश : Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, कुटुंबातील सदस्य मुलावर मुलीला फसविल्याचा किंवा मुलीला जाळ्यात अडकवण्याचा आरोप करतात. मात्र, उत्तर प्रदेशमधील बहराइचमधून समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे. कारण प्रेमात पडलेले प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र त्याचे खापर चक्क वाघावर (Tiger) फोडण्यात आले आहे. वाघाने आमच्या मुलीला जंगलातून पळवून नेल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

कुटुंबात खळबळ, मुलीला वाघाला नेले!

हे प्रकरण बहराईज पोलीस ठाण्याच्या सुजौली येथील आहे. येथील मंगल पूर्वा गावातील 18 वर्षीय तरुणी शनिवारी रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यानंतर कुटुंबीयांनी मुलीला वाघाने पळवून नेल्याची ओरड सुरु केली. यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि लोकांची झोप उडाली. 

'वनविभागाने तपास केला, मुलगी सापडली नाही'

मुलगी आपल्या मित्रासोबत पळून गेली. मात्र, घरच्याना वाटले जंगलातून वाघाने मुलीला पळवले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. पोलिसांसह वनविभागाला माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाच्या पथकाने हत्ती आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने मुलीचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या जंगलात शोध घेतला, मात्र मुलगी सापडली नाही. यानंतर पोलीस पथकाने दुसऱ्या बाजुने तपास सुरु केला, तेव्हा बेपत्ता तरुणी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 3 अपहरणकर्त्यांना जेलमध्ये पाठवले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी रात्री 9.00 वाजता हातपंपावर पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेली होती आणि तेथून ती गायब झाली. मुलीला वाघाने पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. यामुळे ग्रामस्थ संतापले, मात्र या घटनेत वन्यप्राण्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. डीएफओ आणि सीओच्या अहवालावरून दुसऱ्या बाजुने तपास सुरु झाला. पोलीस अधीक्षक केशवकुमार चौधरी यांनी सुजौली पोलिसांना या घटनेचा छडा लावण्याचे निर्देश दिले.

सतीशच्या घरात मुलगी सापडली 

त्यानंतर वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी छापेमारी सुरु करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ताजूपूर गावात राहणारा सतीश तथा ​​कोयली (मुलगा राम सुरत मौर्य) याच्या ठिकाणाहून ही मुलगी ताब्यात घेण्यात आली आहे. सुजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरखडिया गावातील रहिवासी रिंकू मौर्य आणि पिंटू मौर्य यांनाही सतीशसोबत पकडण्यात आले असून, आता तिन्ही आरोपींना जेलमध्ये टाकण्यात आले आहे.