Insurance Premium | करोना काळात विमा झाला महाग; नियमही झाले कठोर, जाणून घ्या

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते जून महिन्यात टर्म आणि हेल्थ इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ दिसून आली आहे.

Updated: Jul 6, 2021, 03:05 PM IST
Insurance Premium | करोना काळात विमा झाला महाग; नियमही झाले कठोर, जाणून घ्या title=

मुंबई :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते जून महिन्यात टर्म आणि हेल्थ इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ दिसून आली आहे. एका रिपोर्टच्या मते हेल्थ इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये साधारण 5 टक्के वाढ झाली आहे. टर्म इंशुरन्समध्ये 8 टक्के वाढ झाली आहे. मागील काही वर्षापासून इंशुरन्स कंपन्यांनी प्रीमियममध्ये वाढ केलेली नव्हती.

इंशुरन्स एग्रीगेटर कंपनी पॉलिसी एक्सच्या रिपोर्टच्या मते एप्रिल ते जूनच्या दरम्यान हेल्थ इंशुरन्स प्रीमियममध्ये सरासरी 5 टक्के वाढ झाली आहे. 

प्रीमियममध्ये किती वाढ?
 रिपोर्टच्या मते, 46 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 लाख रुपयांच्या समएश्योर्डवर 10 टक्के प्रीमियम वाढला आहे. जर टर्म इंशुरन्सचा विचार केला. तर 2020च्या प्रमाणात जून 2021 पर्यंत टर्म इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये साधारण 8 टक्के वाढ झाली आहे. टर्म प्लॅनंमध्ये 10 वर्ष उशीर केल्यास 25 वर्षासाठी 46य2 टक्के आणि 35 वर्षीय व्यक्तीसाठी 72.7 टक्के जास्त खर्च होईल.
 
 कंपन्यांचे नियम कडक
 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंशुरन्स क्लेम करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे कंपन्या रिस्क मॅनेजमेंटच्या मानकांना कठोर बनवत आहे. सर्व लाईफ इंशुरन्स कंपन्यांनी अंडराइटिंगचे नियम कडक केले आहेत.
  - होम आयसोलेशनच्या माध्यमातून तुम्ही कोव्हिड 19 निगेटिव्ह झाल्यास, 3 महिन्यांपर्यंत कोणत्याच इंशुरन्स कंपनीचा टर्म इंशुरन्स खरेदी करता येणार नाही.
 - याशिवाय टेलिमेडिकलच्या जागी आता टर्म इंशुरन्ससाठी कंपन्या डिटेल मेडिकल टेस्टवर जोर देत आहेत.