देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णय

Indian Railways: .  नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 20, 2024, 05:25 PM IST
देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णय title=
रेल्वे जनरल कोच

Indian Railways: देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो. दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा देण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? सर्वसामान्य प्रवाशांना याचा कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वेकडून 370 ट्रेनमध्ये 1000 नवीन जनरल डबे जोडले जात आहेत.  नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बोर्डाने मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक गाड्यांमध्ये 583 जनरल डबे आधीच बसविण्यात आले आहेत. उर्वरित बोगी जोडण्याची प्रक्रिया देशभरातील सर्व रेल्वे झोन आणि विभागांमध्ये सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस ती पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

'पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये येणाऱ्या होळीच्या दिवसापासून आम्ही सज्ज आहोत. सणासुदीच्यादिवशी रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते. अशावेळी गर्दीला तोंड देण्यासाठी आम्ही नियोजन केले असून त्यानुसार तयारी सुरू केली असल्याचे', ते पुढे म्हणाले.

ट्रेनने बाईक दुसऱ्या शहरात कशी पाठवाल? जाणून घ्या रेल्वेच्या 'या' खास सुविधेबद्दल

दररोज 8 लाख प्रवाशांना फायदा 

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 वर्षांत 10 हजार नॉन-एसी डबे जोडण्याची आमची योजना आहे. त्यानंतर 8 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करू शकतील, असे रेल्वेने सांगितले. हे सर्व 10 हजार डबे एलएचबी श्रेणीचे आहेत. ज्यामध्ये अॅडव्हान्स सुरक्षा आणि प्रवाशांना सुविधा देण्यात आली आहे. 

महिलांना मिळतात 'या' खास सुविधा

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, 60 वर्षांवरील महिलांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकिटामध्ये 50% सवलत मिळते. रेल्वेमध्ये काही सीट हे महिलांसाठी आरक्षित असतात. ज्यामध्ये गर्दीच्या वेळी महिला या सीटवर बसून सुरक्षित प्रवास करू शकतात. रेल्वेच्या नियमानुसार एखाद्या महिलेकडे तिकीट नसेल किंवा त्या महिलेचे तिकीट हरवले असेल तर टीटीई त्या महिलेला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.त्यासोबत ज्या महिलांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आहे. अशा महिलांना लोअर बर्थचे टिकीट दिले जाते. ज्यामुळे त्या महिलेला आरामात प्रवास करता यावा. ज्या महिला प्रेग्नेंट आहे. त्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना विचारून त्यांची मधली किंवा वरची सीट खालच्या बर्थसाठी बदलू शकतात.रेल्वे स्टेशनवर महिला काउंटर नसेल तर महिला जनरल काउंटरवर जाऊन कोणत्याही रांगेत न उभे राहता तिकीट बुक करू शकतात.

नवरदेवाचा लग्न मुहूर्त टळू नये म्हणून रेल्वेचा स्पेशल कॉरिडोर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या