भारत लसीकरणात लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा, देशभरात साजरा होणार उत्सव

देशात कोरोना लसीकरण खूप वेगाने सुरू आहे. सर्वांच्या नजरा लसीकरणाच्या आकड्यांवर आहेत.

Updated: Oct 14, 2021, 07:26 PM IST
भारत लसीकरणात लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा, देशभरात साजरा होणार उत्सव title=

मुंबई : देशात कोरोना लसीकरण खूप वेगाने सुरू आहे. सर्वांच्या नजरा लसीकरणाच्या आकड्यांवर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, आतापर्यंत देशात कोविडविरोधी लसीचे 96 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत, त्यापैकी 32 लाखांहून अधिक डोस बुधवारीच प्रशासित करण्यात आले. असा अंदाज आहे की या वेगाने, भारत पुढील आठवड्यापर्यंत 100 कोटींहून अधिक लसीच्या डोसचा आकडा गाठेल.

शासनाची जोरदार तयारी

या निमित्त केंद्र सरकारने विशेष तयारी केली आहे. ज्यावेळी 100 कोटी कोरोना लसी डोस भारतात पूर्ण होतील, त्या वेळी सर्व रेल्वे स्थानके, सर्व विमानतळ, उड्डाणे, बस स्थानकांवर अशा सार्वजनिक ठिकाणी याची घोषणा एकाच वेळी केली जाईल. या व्यतिरिक्त, ही ऐतिहासिक घटना देशात साजरी केली जाईल.

30% लोकांनी घेतले दोन्ही डोस 

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18-44 वयोगटातील लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून 38,99,42,616 डोस पहिला डोस म्हणून दिले गेले आहेत. तर 10,69,40,919  जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. सध्या 30% पात्र लोकसंख्येला दोन्ही डोस दिले गेले आहेत.

मुलांचे लसीकरण करताना काळजी घेणे आवश्यक आहे

याशिवाय मुलांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे मत घेतले जात आहे. लहान मुलांच्या लसीबाबत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

देशात लसीची कमतरता भासणार नाही

आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, पुढील महिन्यापर्यंत देशात आणखी कोरोना लस उपलब्ध होतील आणि आपल्या देशाच्या गरजेहून अधिक असलेल्या लस इतर देशांमध्ये निर्यात केल्या जातील. भारताने नेपाळ, बांगलादेश, इराण, म्यानमार सारख्या देशांना आतापर्यंत 10 लाख कोरोना लस दिल्या आहेत.