Income Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax

Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते.   

Updated: Dec 24, 2022, 01:07 PM IST
Income Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax title=
Income Tax Regime

Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते. सध्या अशी प्रकरणं अनेकदा समोर आली आहेत यामध्ये मोठमोठ्या लोकांचाही समावेश आहे. ज्यात मोठे सेलिब्रेटी आणि मनोरंजन विश्वाशी (Highest tax payers in India) जोडलेली लोकं आहेत परंतु भारत देशाच्या प्राप्तिकर कायद्यानुसार सर्वांना त्यांना मिळालेल्या उत्पन्नावर कर भरावाच लागतो. वेगवेगळ्या उत्पन्नांवर वेगवेगळे कर आहेत. ज्यांचे उत्पन्न जास्त त्यांना तेवढा जास्त कर भरणे अपरिहार्य आहे. आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या उत्पन्नांवर वेगवेगळा टॅक्स असतो यालाच टॅक्स स्लॅब असं म्हणतात. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादेच्या वर म्हणजे त्याहून जास्त असेल तर त्यांना त्याप्रमाणे ठरलेल्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागतो. (income tax rate for 10 lakhs income what the percentage rate difference between old and new tax regime)

करदात्यांना नेहमीच अशा प्रश्न पडतो की जुन्या कर प्रणालीनं जावं की नव्या कर प्रणालीनं? त्यामुळे त्याबाबतीत अनेक जणं गोंधळतात. आपल्या देशात या दोन्ही करप्रणालीनं कर वसूल करता येतो. भारतीय आयकर स्लॅब प्रणालीच्या आधारावर करदात्यांकडून आयकर विभाग कर आकारतो. तर जेव्हा तुमच्या उत्पन्नात वाढ होते तेव्हा तुमच्या कराचे दरही वाढत जातात. अर्थसंकल्पात नित्यनियमानं काही बदल काळानूसार आणि गरजेनुसार होत असतात. त्यात हे बदल इन्कम टॅक्समध्येही होत असतात. अशातच पुढील वर्षी येणाऱ्या अर्थसंकल्पातही टॅक्स स्लॅबमध्ये (Tax Slab) बदल होऊ शकतात. पण येणाऱ्या बजेटपुर्वी जाणून घेऊया या वर्षात (2022-23) तुमचा टॅक्स स्लॅब काय सांगतो. 

हेही वाचा - Gold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

काही दिवसातच अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. आत्ताच्या कर व्यवस्थेकडे पाहिलं तर जुन्या आणि नव्या कर प्रणालीनुसार खूप मोठा फरक असल्याचे जाणवून येईल. 2021-22 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर जुन्या आणि नव्या कर प्रणालीमध्ये 10 लाख रूपयांच्या उत्पन्नापर्यंतच्या करदात्यांना वेगवेगळा कर वेगवेगळ्या दरानं आकारला गेला. या दोन करप्रणालीच्या टॅक्स स्लॅबमध्ये 5 टक्क्यांचा फरक असल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर्षीच्या टॅक्स स्लॅबमध्ये 

काय आहे जुन्या आणि नव्या कर प्रणालीमध्ये फरक?

नवीन कर प्रणालीमध्ये 7.5 लाख ते 10 लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के दराने कर भरावा लागतो परंतु जुन्या कर प्रणालीमध्ये तसं नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांना 5 लाख ते 10 लाख रूपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर भरावा लागतो. तेव्हा हा फरक 5 टक्क्यांचा फरक आहे.