'पेड सेक्स' : 'आधार' अनिवार्य, गोव्यातील प्रकार

गोव्याला जाऊन तुम्ही 'पेड सेक्स' करू इच्छित असाल तर, तुमच्याकडे आधारची विचारणा केली जाऊ शकते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 17, 2017, 08:53 AM IST
'पेड सेक्स' : 'आधार' अनिवार्य, गोव्यातील प्रकार title=

पणजी : बँक, मोबाईल कंपन्या आणि सरकारी कागदपत्रांची जुळवाजूळव करण्यासाठी आधार कार्डची मागणी होणे आता नवे नाही. पण, नवे आणि आश्चर्यकारक हे की, वेश्याव्यवसायातही (पेड सेक्स) आता आधार कार्डची मागणी होऊ लागली आहे. खास करून हा प्रकार गोव्यात पहायला मिळत आहे. त्यामुळे गोव्याला जाऊन तुम्ही 'पेड सेक्स' करू इच्छित असाल तर, तुमच्याकडे आधारची विचारणा केली जाऊ शकते.

काय आहे प्रकार ?

मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीतील 5 तरूणांना याची प्रचीती आली. हे तरुण बॅचलर पार्टी साजरी करण्यासाठी दिल्लीहून गोव्याला गेले होते. गोव्यातील एका हॉटेलवर या तरूणांनी मुक्काम ठोकला. गोव्यात भटकल्यावर या तरूणांना 'पेड सेक्स' करण्याची इच्छा झाली. त्यांनी एका कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क केला. समोरून प्रतिसाद येताच या मुलांनी 5 तरूणींची मागणी केली. काही वेळाने तरूणीं व्यवस्था केल्याचे संबंधीत कॅन्टॅक्टने सांगितले. मात्र, थोड्या वेळाने त्या कॉन्टॅक्टने त्या मुलांना पुन्हा फोन केला.

म्हणून होतेय 'आधारची विचारणा'

संबंधीत कॉन्टॅक्टने मुलांकडे नाव, हॉटेल आदी गोष्टींचा तपशील घेतला. पण, तो कॉन्टॅक्ट इतका तपशील घेऊन थांबला नाही. तर, त्याने संबंधीत तरूणांकडे आधारची मागणीही केली. सुरूवातीला हे तरुण गोंधळून गेले. पण, काही वेळाने या तरूणांना यातले वास्तव ध्यानात आले. गोवाच काय देशातील कोणत्याही ठिकाणी देहव्यापार करायला कायदेशिर मान्यता नाही. त्यामुळे अशा धंद्यांवर पोलीस बारीक लक्ष ठेऊन असतात. थोडीशी जरी माहिती लागली तरी, पोलीस छापे टाकून कायदेशीर कारवाई करतात. त्यामुळे या धंद्यातले लोक नेहमीच सावध असतात. हे तरूणही पोलिसांचे तर लोक नाहीत ना? याची खात्री करून घेण्यासाठी दलाल लोक ग्राहकांकडे आधारची मागणी करत असल्याचे पुढे आले आहे.