IAS Tina Dabi : आयएएस टीना दाबी यांनी सांगितले खरं, 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडे यांच्याशी का केलं लग्न ?

Tina Dabi Marriage : आयएएस टीना दाबी  (Tina Dabi) या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक. आजही त्यांच्या नावाची चर्चा होत असते. आज त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत आहोत. त्यांचे दुसरे लग्न झाले त्याचवेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न..

Updated: Dec 4, 2022, 09:31 AM IST
IAS Tina Dabi : आयएएस टीना दाबी यांनी सांगितले खरं, 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडे यांच्याशी का केलं लग्न ? title=

Tina Dabi Pradeep Gawande Marriage : आयएएस टीना दाबी  (Tina Dabi) या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक. (Marathi latest news) आजही त्यांच्या नावाची चर्चा होत असते. आज त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत आहोत. त्यांचे दुसरे लग्न झाले त्याचवेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न होता की, एवढ्या मोठ्या आयएएस ऑफिसर प्रदीप गावंडे  (Pradeep Gawande) यांच्याशी ती लग्न केले. त्यानंतर त्यांनीही यावर मोकळेपणाने बोलत लग्न का केले हे सांगितले. आयएएस टीना दाबी आणि आयएएस प्रदीप गावंडे हे दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. (Tina Dabi Pradeep Gawande Marriage)

युपीएससी (UPSC) टॉपर 

युपीएससी (UPSC) टॉपर असेलेल्या टीना डाबी (Tina Dabi) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. टीना डाबी या राजस्थान कॅडरच्या आयएएस (IAS) अधिकारी असून 2013 मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांच्यासोबत लग्न केले आहे. आयएएस टीना (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे त्यांच्या लग्नामुळे (Marriage) खूप चर्चेत होते. दोघांच्या एकत्र येण्याची गोष्टही फारच खास आहे. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न झाले. 

IAS Tina Dabi: हिट हैं आईएएस टीना डाबी की ये पांच रील, आप खुद ही देख लीजिए क्यों?

IAS टीना दाबी या 2015 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. टीना दाबीची सोशल मीडियावरही चांगली फॅन फॉलोइंग आहे. एकट्या इंस्टाग्रामवर त्याचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. 

प्रदीप गावंडे यांच्याबद्दल जाणून घ्या

आता टीना दाबीचे पती प्रदीप गावंडे यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर IAS प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत. त्याची तयारी प्रदीप गावंडे यांनी दिल्लीत केली. प्रदीप हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि त्यांची अखिल भारतीय रँक 478 होती. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप गावंडे यांनी औरंगाबाद येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणूनही आपली सेवा बजावली आहे. IAS टीना दाबी म्हणाल्या होत्या की, प्रदीप देखील मराठी कुटुंबातील आहे आणि माझी आई देखील मराठी कुटुंबातील आहे. 

आधी प्रपोज कोणी केले?

टीना दाबी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रदीप गावंडे एक चांगला माणूस आहे. प्रदीपने तिला आधी प्रपोज केल्याचेही टीनाने सांगितले. दुसरीकडे, स्वत:पेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीपशी लग्न करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, वयाच्या आधारावर नातेसंबंध ठरवले जात नाहीत. परस्पर समंजसपणा, प्रेम आणि अनुकूलता खूप महत्वाची आहे. आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भेटले. दोघेही राजस्थानच्या आरोग्य विभागात एकत्र काम करत होते.