Navy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज

Indian Navy SSR/MR Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय नौदलात तब्बल 1500 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवाराने अर्ज कसा करायचा, पात्रता आणि इतर तपशिलाबाबत अधिक जाणून घ्या.

Updated: Dec 4, 2022, 08:28 AM IST
Navy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज  title=

Agniveer Indian Navy Recruitment 2022: दहावी आणि बारावी पास उमेदरावांना नौदलात नोकरीची संधी आहे. ( Indian Navy Day ) भारतीय नौदलाने 3 डिसेंबर रोजी रोजगार वृत्तपत्रात सीनियर सेकेंडरी रिक्रूट  (SSR)आणि मैट्रिक भरती (MR) अंतर्गत अग्निवीर पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदल SSR MR ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होईल. यासाठी, इच्छुक अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवार 17 डिसेंबर 2022 पर्यंत भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात.

भारतीय नौदलात (Indian Navy) 1500 रिक्त पदे भरेल त्यापैकी 1400 रिक्त जागा भारतीय नौदल SSR भरती 2022 साठी आहेत आणि 100 रिक्त जागा भारतीय नौदल MR भरती 2022 साठी 01/2023 (मे 23) बॅचसाठी आहेत. SSR भरती अंतर्गत 1120 पुरुष आणि 280 महिला उमेदवारांची भरती केली जाईल आणि MR भरती अंतर्गत 80 पुरुष आणि 20 महिला उमेदवारांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. 

शैक्षणिक पात्रता

SSR - उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान या विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी.

MR - उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून उमेदवाराचा जन्म 1 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान झालेला असावा. यामध्ये दोन्ही तारखांचाही समावेश आहे. 

भारतीय नौदलातील अग्निवीर SSR/MR भरती 2022 साठी निवड प्रक्रिया

- उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेद्वारे केली जाईल.

- लेखी परीक्षा

- पीएफटी आणि प्राथमिक वैद्यकीय

- अंतिम भरती वैद्यकीय परीक्षा

भारतीय नौदलातील अग्निवीर SSR/MR भरती 2022 साठी अर्ज कसा करायचा.

- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in ला भेट द्या.

- तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर  'नोंदणी करा' वर क्लिक करुन तुमच्या ईमेल आयडीसह स्वतःची नोंदणी करा. 

- आता तुमच्या ईमेल आयडीने 'लॉग-इन' करा आणि "Current Opportunities" वर क्लिक करा.

- आता तुमच्या समोरील डिस्प्लेवर Apply चे बटण येईल, त्यावर क्लिक करा. 

- आता तेथे विचारलेले सर्व आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. 

- 'सबमिट' बटणावर क्लिक करा. 'सबमिट' बटणावर क्लिक करण्यापूर्वी, कृपया खात्री करा की सर्व तपशील बरोबर आहेत आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा.