आता PF खात्यातून लगेच काढले जातील पैसे, कसं? ते जाणून घ्या

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एक तासाच्या आत पीएफची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. हे कसं करायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप.

Updated: Jun 28, 2022, 10:54 PM IST
आता PF खात्यातून लगेच काढले जातील पैसे, कसं? ते जाणून घ्या title=

मुंबई : नोकरदारांसाठी पीएफचे पैसे वाईट काळात उपयोगी पडतात. तज्ज्ञांनी असेही सुचवले आहे की, पगारदार वर्गाने पीएफचे पैसे केवळ तेव्हाच वापरावेत किंवा खात्यातून काढावेत, जेव्हा त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नसेल. कारण हे पैसे जर त्यांनी दिर्घकाळ खात्यात ठेवले, तर त्यांना याचा भरपूर फायदा होईल. ईपीएफओने पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्याची सुविधा सुरू केल्यानंतर लोकांची मोठी सोय झाली आहे. 

देशात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पीएफ खातेधारकांना पैसे काढण्यासाठी तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही.

ज्यामुळे आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एक तासाच्या आत पीएफची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. या अंतर्गत त्यांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

चला तर मग ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कसे पैसे काढू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशा प्रकारे काढा पैसे

- सर्वप्रथम www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवर जा.
- आता वरच्या उजव्या कोपर्‍यात दिलेल्या Online Advance Claim वर क्लिक करा.
- तेथे https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक करा
- येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला फॉर्म-31,19,10C आणि 10D दिसेल.
- तुमच्या बँक खात्यातील शेवटचे ४ अंक टाकून पडताळणी करा.
- यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
- ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
- आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
-  रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- नंतर तुमचा पत्ता टाका
- Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.

खरंतर पूर्वी पीएफमध्ये क्लेम केल्यानंतरही पैसे मिळण्यासाठी ३ ते ७ दिवस लागायचे. या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही तासांत पैसे खातेदारांच्या ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला होता.