HMPV Outbreak : कोरोना व्हायरसची दोन वर्षं कुणीच विसरणार नाही. त्यात ‘नवीन’ व्हायरसची भारतात एंट्री झाल्याने लोकांच्या आणि तुमच्या-आमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. हा व्हायरस कोरोनासारखाच आहे का? त्यातही लॉकडाऊन लागेल का? अशी प्रश्नं सर्वांना पडत आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.
होय. कोरोना व्हायरसची लस घेतलेल्या व्यक्तींनाही HMPV व्हायरसची लागण होऊ शकते.
नाही. HMPV व्हायरसचा फैलाव सध्या चीनमध्ये होत असला तरीही या व्हायरसचा उगम चीनमध्ये झालेला नाही. या व्हायरसचा उगम नेदरलँडमध्ये झाला होता.
नाही. सर्वात आधी या व्हायरसचा प्रादुर्भाव नेदरलँड येथे 2001 मध्ये दिसून आला होता. काही वर्षांनी हा युरोप आणि अमेरिकेतही सापडला होता. सध्या चीन आणि मलेशियात याचा सर्वाधिक फैलाव होतोय.
कोरोना व्हायरस प्रमाणे हा व्हायरस संसर्गजन्य आहे. याचा फैलाव शिंकल्याने, संसर्ग असलेल्या रुग्णाला स्पर्श केल्याने आणि व्हायरस असलेल्या ठिकाणाला स्पर्श केल्याने पसरतो. परंतु, कोरोनाप्रणाणे हा व्हायरस वातावरणात पसरलेला नाही. कोरोनाप्रमाणे या व्हायरसचा संसर्ग हा हवेतून होतो याचा अद्याप पुरावा नाही.
कोरोना व्हायरसची लक्षणे आणि तीव्रता HMPV च्या तुलनेत खूप अधिक होती. सोबतच, कोरोना फैलाव अगदी बोलण्यातून आणि नुसतं हवेतून सुद्धा होतो. त्यामुळे, कोरोना काळाप्रमाणे HMPV व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लागेल याची शक्यता खूप कमी आहे.
डॉ. अविनाश भोंडवे यांनी झी २४ तासला दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसचा सर्वात जास्त धोका तान्ह्या बाळांना, पाच वर्षाखालील मुला-मुलींना आणि वयोवृद्ध लोकांना अधिक आहे. ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, त्यांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.
2001 मध्ये सर्वप्रथम या व्हायरसचा उद्रेक झाला. हिवाळ्यात याचा धोका अधिक असतो. परंतु, HMPV व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण खूप दुर्मिळ आहे.
HMPV व्हायरसची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रकार क्वचितच घडले. ज्या रुग्णांना आधीच गंभीर आजार आहे, असे आजार ज्यात एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक्षमता कमी होते त्यांनी या व्हायरसपासून खूप सावध राहण्याची गरज आहे.
HMPV व्हायरसवर सध्या लस उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर ठराविक औषधही नाही. सध्या सावधगिरी आणि लक्षणांनुसार उपचार घेतले जातात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)