Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा

Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 13, 2023, 01:40 PM IST
Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा title=
heavy rain alert flood monsoon live updates india rainfall delhi rain north indian states himachal pradesh punjab haryana landslides

All India Weather Forecast : हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवलं आहे. तर दिल्लीतही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये (Himachal Pradesh Uttarakhand Rain Alert) येत्या 48 तासांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पुराची (Flood Latest News) स्थिती आहे. हजारो पर्यटक पुरात अडकले असून राज्यात मदत आणि बचावा कार्य जोरदार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुल्लूमधून आतापर्यंत 13 मृतदेह पुरातून बाहेर काढण्यात आले आहेत.  (heavy rain alert flood monsoon live updates india rainfall delhi rain north indian states himachal pradesh punjab haryana landslides)

राजधानी दिल्लीला पुराचा विळखा (Yamuna River Water Level) 

यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे राजधानी दिल्लीला पुराचा विळखा पडला आहे.  यमुना नदीच्या पाण्याची पातळी आज 207.55 मीटरवर गेली आहे. 1978 सालचा यमुना नदीचा  207.49 मीटरचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दरम्यान खबरदारी म्हणून पूरप्रवण भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे.  तर यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबद्दल दिल्ली एलजीने आज डीडीएमएची बैठक बोलावली आहे.

शिवाय पूरसदृश परिस्थितीमुळे आजपासून दिल्लीतील 17 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

 

हेसुद्धा वाचा - Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

15 आणि 16 जुलैला हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पाऊस आणि पुरामुळे हिमाचलमधील आतापर्यंत 873 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या राज्यात आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून हरियाणा-पंजाबमध्येही पूरसदृश स्थिती आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 

हिमाचल प्रदेशातील चंद्रतालमध्ये अडकलेल्या 300 पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. एडीसी राहुल जैन यांनी सांगितले की, जोरदार बर्फवृष्टीमुळे चंद्रतालवर तीन ते चार फूट बर्फ साचला असून इथल्या तापमानातही मोठी घट झाली आहे. आता चंद्रतालवरमधील तापमान उणे 5 च्या आसपास गेलं आहे. 

उत्तराखंडमध्येही संततधार पावसामुळे सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने राज्यातील अनेक भाग पुरात बुडाल्याचं चित्र आहे.