ज्ञानवापी प्रकरण : व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली

Gyanvapi case: अलाहबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षकारांना ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. तर, मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 26, 2024, 11:41 AM IST
ज्ञानवापी प्रकरण : व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली title=
Gyanvapi case Allahabad HC dismiss Muslim side plea

Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने  मोठी निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पुजेचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिक पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 31 जानेवारी रोजी हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाराणसी कोर्टाच्या आदेशाने मुस्लिम पक्षकारांकडून अंजुमन इंतजामिया मस्जिदी कमेटीने हायकोर्टात आव्हान दिले होते. 

वाराणसी जिल्हा न्यायालयानेही या प्रकरणात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. याच निर्णयाविरोधात मु्स्लिम पक्षाने अलाहाबाद कोर्टात धाव घेतली होती. मात्र, येथेही त्यांच्या हाती निराशाच आली आहे. अलाहबाद न्यायालयाने ज्ञानवापी उच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंच्या पूजाचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. तर, मुस्लिम पक्षकारांकडून अद्यापही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. 

मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं काय?

हायकोर्टाने हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्या याचिका ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर अंजुमन इंतजामिया कमेटीच्यावतीने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यावर पूजेवर बंदी घालण्यात यावी, असं नमूद केलं होतं. मुस्लिम पक्षकारांचा दावा होता की, जिल्हा आधीक्षकांना वाराणसी कोर्टाने रीसिव्हर नियुक्त केलं आहे. तेच पहिले काशी विश्वनाथ मंदिराचे सदस्य आहेत. म्हणूनच त्यांना नियुक्त करण्यात येऊ नये. तसंच, मुस्लिम पक्षकारांनी म्हटलं आहे की, कोणत्याही दस्तावेजमध्ये तळघराचा उल्लेख केला नाहीये. मुस्लिम पक्षने याचिकेत हे देखील नमूद केले आहे की, व्यासजींनी पहिले पूजेचा अधिकार ट्रस्टला सोपवला होता. त्यामुळं त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाहीये. 

काय आहे नेमकं प्रकरण?

ज्ञानवापी मशिदी सर्वेक्षणानंतर तळघराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या प्रकरणात शैलेंद्र कुमार पाठक यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर 31 जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षकारांना पूजेचे अधिकार दिले होते. जिल्हा न्यायालयाच्या आदेशांनंतर काशी विश्वनाश ट्रस्टने पूजा-अर्चना सुरु केली होती. 

व्यास तळघरातील पूजेचा इतिहास 

- 1993 पर्यंत तळघरात पूजा केली जात होती असा व्यास कुटुंबाचा दावा
- तत्कालीन सरकारने तळघरात होणाऱ्या पूजेवर बंदी घातली होती.
- तळघरात गेल्या 31 वर्षांपासून पूजा बंद होती
- शतानंद व्यास यांनी 1551 मध्ये पूजा केली असा व्यास कुटुंबाचा दावा
- सप्टेंबर २०२३: शैलेंद्रपाठक व्यास यांनी न्यायालयात याचिका दाखल केली
- व्यास तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराबाबत याचिका
- तळघर डीएमकडे सोपवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली
- 17 जानेवारी : जिल्हा प्रशासनाने तळघराचा ताबा घेतला.
- 31 जानेवारी : तळघरात पूजेला जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली.
- मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
- या निर्णयाला मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते