'मुस्लिमांच्या वास्तव्यास १५० देश आहेत, तर हिंदुंसाठी फक्त एकच'

असा एकच देश आहे तो म्हणजे.... 

Updated: Dec 25, 2019, 08:35 AM IST
'मुस्लिमांच्या वास्तव्यास १५० देश आहेत, तर हिंदुंसाठी फक्त एकच' title=
संग्रहित छायाचित्र / सीेएए

सुरत :  Citizenship Amendment Act (CAA) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या विजय रुपाणी यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केलं. मंगळवारी अहमदाबाद येथील साबरमती आश्रम येथे रॅलीमध्ये त्यांनी मुस्लिमांच्या वास्तव्यासाठी १५० देश आहेत जिथे ते जाऊ शकतात, तर हिंदूसाठी असा एकच देश आहे तो म्हणजे भारत; असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. 

भाजपकडून मंगळवारी गुजरातमधील विविध शहरांमध्ये ६२ रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं. सीएएच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि अनेकांचा समावेश होता. याचवेळी रॅलीसाठी आलेल्या जनसमुदायाला संबोधित करत रुपाणी यांनी त्यांची मतं मांडली. 'भारतातील मुस्लीम हे अतिशय आनंदात असून, त्यांची लोकसंख्या ही ९ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धर्मनिरपेक्ष संविधानामुळे ते भारतामध्ये प्रतिष्ठेचं जीवन जगत आहेत', असं ते म्हणाले. 

पाकिस्तानाती हिंदूंचं प्रमाण हे २२ टक्क्यांवरुन थेट तीन टक्क्यांवर पोहोचल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी यावेळी काही मुद्द्यांवर जोर दिला. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान, बलाक्तार ही कारणं देत जे भारतीय अनेक वर्षांपूर्वी भारतात आले ते या ठिकाणी नागरिकत्व नसल्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित आहेत ही बाब त्यांनी मांडली. 

First meeting of new Gujarat cabinet led by Vijay Rupani on Wednesday

बांगलादेशमध्ये हिंदुंची लोकसंख्या ही अवघी दोन टक्के आहे. तर, अफगाणीस्तान मध्ये हिंदू आणि शिखांचं प्रमाण हे ५००च्या आसपास असावं असं रुपाणी म्हणाले. याचवेळी त्यांनी, 'मुस्लिमांच्या वास्तव्यासाठी १५० देश आहेत जिथे ते जाऊ शकतात, तर हिंदूसाठी असा एकच देश आहे तो म्हणजे भारत' असं वक्तव्यही केलं. 

वाचा : Chhapaak : दीपिकाआधी 'या' अभिनेत्रीने साकारलेली ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका

विरोधकांवर डागली तोफ 

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांसाठी रुपाणी यांनी विरोधकांना जबाबदार ठरवलं. काँग्रेस आणि त्यांच्या साथीने असणाऱ्या पक्षांकडून देशात अराजकता पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडून देशातील नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचाच मुद्दा त्यांनी उचलून धरला.