मुंबई : डिसेंबर महिना उजाडल्यानंतर सर्वांनाच चाहूल लागते ती म्हणजे #Christmas अर्थान नाताळ सणाची. ख्रिस्त धर्मीयांसाठी अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या सणाची धूम यंदाच्या वर्षीही पाहायला मिळत आहे.फक्त ख्रिस्ती बांधवच नव्हे तर, सर्वजण या सणाच्या स्वागतासाठी आपआपल्या परिने सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने पूर्वसंध्येला अनेक चर्चमध्ये खास मासचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नवे कपडे घालत आणि चेहऱ्यावर आनंदाची भावमुद्रा आणत अनेकांनी या मासला हजेरी लावली. महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, गोवा येथेही नाताळसणाची धूम पाहायला मिळत आहे.
ख्रिसमस निमित्त स्वप्ननगरी मुंबईलासुद्धा एक वेगळा साज चढला आहे. ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी उत्साहाला उधाण आलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारा वांद्रे-वरळी सी लिंक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. नाताळ सणाच्या निमित्ताने मुंबईतील चर्च तसंच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Goa: Midnight mass at Our Lady of the Immaculate Conception Church, in Panaji. #Christmas pic.twitter.com/pXTwMkGuAH
— ANI (@ANI) December 24, 2019
Karnataka: Midnight mass being held at the Saint Francis Xavier's Cathedral in Bengaluru. #Christmas #MerryChristmas pic.twitter.com/vlDcC4Bo4x
— ANI (@ANI) December 24, 2019
वसईतही नाताळची धूम
प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणजेच नाताळ सणाच्या स्वागतासाठी वसईत सर्वच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीचा मिस्सा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान मुख्य धर्मगुरूंकडून रोज चर्चमध्ये सेवा करण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव करण्यात आला.
Karnataka: Midnight mass being held at the Saint Francis Xavier's Cathedral in Bengaluru. #Christmas #MerryChristmas pic.twitter.com/vlDcC4Bo4x
— ANI (@ANI) December 24, 2019
रायगडमध्येही पाहायला मिळाला हात उत्साह
येशूच्या जन्माचा सोहळा अर्थात नाताळच्या सणाला रायगड जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. अलिबाग , कोर्लई , नागोठणे येथील चर्चवर आकर्षकरोषणाई करण्यात आली आहे . अशा या उत्साही वातावरणातच 'झी २४तास'कडूनही नाताळसणाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. #MerryChrismas