नवीन वर्षात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकारची खूशखबर

जर तुम्ही डिजिटल पेमेंट करतात तर तुमच्यासाठी मोदी सरकार नव्या वर्षात खूशखबर घेऊन येणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 2, 2018, 03:59 PM IST
नवीन वर्षात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकारची खूशखबर title=

नवी दिल्ली : जर तुम्ही डिजिटल पेमेंट करतात तर तुमच्यासाठी मोदी सरकार नव्या वर्षात खूशखबर घेऊन येणार आहे.

सरकारचा दिलासा

डेबिट कार्ड, भीम अॅप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास २००० रुपयपर्यंतच्या रकमेवर सरकार कोणतेही चार्जेस नाही घेणार आहे. ही सुविधा १ जानेवारीपासून लागू झाली आहे.

डिजिटल पेमेंटवर सूट

अर्थ सेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विट करत म्हटलं की, हॅप्पी डिजिटल २०१८, डिसेंबर तिमाहीमध्ये भीम अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्याचं प्रमाण ८६ टक्क्यांनी वाढलं आहे. भीम अॅपच्या माध्यमातून १३,१७४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. १४.५६ कोटी वेळा हे व्यवहार झाले. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डेबिट कार्ड किंवा भीम अॅपमधून २००० रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क न घेण्याचं ठरवलं आहे. दुकानदारांवर देखील कोणतेही शुल्क नाही आकारण्यात येणार आहे.

सरकार उचलणार भार

सरकार १ जानेवारी, २०१८ पासून २ वर्ष एमडीआरचं बोझा उचलणार आहे. बँकांना यासाठी सरकार पैसे देणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर २५१२ कोटींचा ताण येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत मागच्या महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.