ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, दागिने घेणे महागणार; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले आहेत. काय आहेत भाव जाणून घेऊया.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 11, 2024, 12:23 PM IST
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, दागिने घेणे महागणार; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर title=
gold silver price rise on mcx amid surge on comex 22kt 24kt gold rates jump

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. या आठवड्यात तिसऱ्यांदा सोनं वधारलं आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या रिटेल किंमतीत तेजी आली आहे. वायदे बाजारात सोनं 78,700 रुपयांवर पोहोचलं आहे तर, मौल्यवान धातुचा रिटेल भाव 80 हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात जियो पॉलिटिकल टेन्शन आणि यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपातीची शक्यता आहे त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारी सोनं दोन आठवड्यांच्या उच्चांकीवर 2698 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं होतं. 25 नोव्हेंबरनंतर डॉलर इतका वधारला होता. या दरम्यान यूएस गोल्ड फ्युचर्स 2734 डॉलरवर ट्रेड करत आहे. चांदीदेखील 31.93 डॉलरवर पोहोचलं आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून 79,470 रुपये प्रतितोळावर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून 72,850 रुपयांवर स्थिरावले आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून 59,610 रुपयांवर भाव स्थिरावले आहेत. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72, 850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79, 470 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59, 610 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,285 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,947 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 961 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,280 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63, 576 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,688 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-72, 850 रुपये
24 कॅरेट-79, 470 रुपये
18 कॅरेट- 59, 610 रुपये