Google Year in Search 2024: अमुक एक गोष्ट कशी करावी इथपासून अमूक एका ठिकाणी कसं पोहोचायचं, आर्थिक नियोजन कसं करायचं इथपासून बहुसंख्य प्रश्न आणि बहुसंख्य व्यक्तींविषयी Google वर सर्च करण्यात येतं. दरवर्षी गुगलकडूनच यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाते. यंदाच्या वर्षीसुद्धा अशीच एक यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीमध्ये भारतीयांनी 2024 या वर्षभरात गुगलवर नेमकं काय काय सर्च केलं, कोणते प्रश्न विचारले यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये स्वाभाविकपणे यंदाच्या वर्षी सर्वाधिक आघाडीवरच्या सर्चमध्ये क्रिकेट आणि राजकारण हे मुद्दे पाहायला मिळाले. याशिवाय भारतातील उद्योगरत्न रतन टाटा यांच्याविषयीसुद्धा गुगलनं खूपकाही सर्च केलं. The Indian Premier League (IPL), T20 World Cup आणि BJP हे शब्द वापरत भारतीयांनी बऱ्याच गोष्टी गुगलवर सर्च केल्या.
12 ते 18 मे दरम्यानच्या काळात भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेला शब्द होता Indian Premier League आणि त्यामागोमाग होता T20 World Cup. तर, जून महिन्यात 2 ते 8 तारखेदरम्यान देशात सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरला, BJP. राजकीय वर्तुळात नेमकं काय सुरुय आणि भाजपची यात काय भूमिका हेच जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर त्यासंदर्भातील माहिती शोधली जात होती.
फक्त राजकारण, क्रिकेटच नव्हे तर पर्यावरणविषय मुद्दे आणि हवामान विषयक अनेक प्रश्नही गुगलवर सर्च करण्यात आले यामध्ये सर्वाधिक सर्च होणारा शब्द ठरला excessive heat. वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या रतन टाटा यांच्याविषयी भारतीयांनी बरंच काही सर्च केलं, त्यांच्या फोटोंपासून व्हिडीओ आणि इतर सर्व प्रकारच्या माहितीला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.