Gold Rate | लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.

Updated: Apr 13, 2022, 03:13 PM IST
Gold Rate | लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे दर title=
मुंबई : Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX)आज सोन्याची किंमत दुपारी 2 वाजे दरम्यान, 53003 रुपये प्रति तोळे इतके होता. तर चांदीचे दर 69250 रुपये प्रति किलो इतके होते. 
 
मुंबईतील सोने-चांदी व्यवसायिकांमध्ये पुन्हा वर्दळ वाढली आहे. काही ग्राहक गुंतवणूकीसाठी तर काही सणासुदीला सोनं खरेदीसाठी सराफा बाजारात येत आहेत. सध्या लग्नाकार्याचेही मुहूर्त सुरू झाले आहेत. त्यामुळे सराफा बाजारातही गर्दी दिसून येत आहे.
 
आड मुंबईत आजच्या सोन्याचे दर 54500 रुपये प्रति तोळे इतके आहेत. तर चांदीचे दर 68800 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरांमध्ये 350 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1,000 रुपये प्रति किलोची वाढ नोंदवली गेली आहे.