Covid 19 update in india : देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा चौथ्या लाटेचा (Corona Forth wave) धोका ही असू शकतो. कारण आकडे त्याच दिशेने निर्देश करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मंगळवारी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली. जगातील 10 देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने थैमान घातले आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, फ्रान्स, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे.
भारताचे आकडेही चिंता वाढवणारे आहेत. गेल्या 28 दिवसांत देशात 5,474 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 40 हजार 866 जणांना कोरोनाची (Corona positive) लागण झाली आहे. मात्र, ही देखील दिलासा देणारी बाब आहे की, या चार आठवड्यात 58 हजार 158 लोक संसर्गातून बरेही झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील 29 जिल्ह्यांमध्ये कोरोना अनियंत्रित आहे. म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांहून अधिक आहे.
केरळमधील 14 जिल्ह्यांमध्ये स्थिती सर्वात वाईट आहे. या सर्व जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे. याचा अर्थ 100 लोकांची चाचणी मागे 10 लोकं कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. मिझोराममधील सात जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे आणि तीन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के आहे.
हरियाणातील गुरुग्राममधील परिस्थितीही चिंताजनक आहे. येथे पॉझिटिव्हीटी रेट 5.81% आहे. याशिवाय, मणिपूर आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक जिल्हा आहे जिथे पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांगमध्ये, सर्व लोकांची तपासणी केली जात असल्याचे आढळून आले आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये 12.5% च्या दराने नवीन प्रकरणे वाढत आहेत.
11 एप्रिल रोजी देशात कोरोनाचे 796 नवे रुग्ण आढळले, मात्र तीन राज्यांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये गुजरात, दिल्ली आणि हरियाणाचा समावेश आहे. गुजरातमध्ये दैनंदिन प्रकरणांमध्ये 42.4%, दिल्लीत 34.9% आणि हरियाणामध्ये 18.1% वाढ झाली आहे.
दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीपमध्ये कोरोनाची वाढ शून्य आहे, तर इतर सर्व राज्यांमध्ये नकारात्मक वाढ आहे. याचा अर्थ येथे नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जर आपण पॉझिटिव्हीटी रेट पाहिला, तर केरळ, मणिपूर, दिल्ली आणि हरियाणा यामध्ये पुढे आहेत. केरळमध्ये प्रत्येक 100 लोकांपैकी सर्वाधिक 2.3% लोक संक्रमित आहेत. पॉझिटिव्हीटी रेट मणिपूरमध्ये 1.5%, दिल्लीमध्ये 1.4% आणि हरियाणामध्ये 1.1% आहे. इतर सर्व राज्यांमध्ये ते शून्याच्या खाली आहे.
वाढत्या प्रकरणांमध्ये, आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांसाठी इशारा जारी केला आहे. त्यात दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. मंत्रालयाने या राज्यांना सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे. आरोग्य सचिवांनी सांगितले की, या राज्यांमध्ये दररोज पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे, म्हणजेच दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाहता, राज्य सरकारांनी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास कोविड-19 बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.
15 ते 21 मार्चपर्यंत देशात 471 जणांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. पण पुढच्याच आठवड्यात म्हणजे 22 ते 28 मार्च दरम्यान मृतांची संख्या 4465 वर पोहोचली. 25 मार्च रोजी सर्वाधिक 4100 मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 4007 आणि केरळमध्ये 81 मृत्यू झाले आहेत. सुधारित आकडेवारीमुळे महाराष्ट्रात मृतांचा आकडा वाढला आहे. राज्य सरकारने येथे जुन्या मृत्यूचीही भर घातली आहे. या संख्येमुळे या आठवड्यात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यानंतर 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 315 आणि 5 ते 11 एप्रिल दरम्यान 223 मृत्यू झाले.