मुंबई : गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी म्हणजे 16 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर, दुपारी 1 वाजता, सोन्याचा भाव 288 रुपयांनी किंवा 0.60% ने वाढला आणि त्याची किंमत 48,375 रुपये प्रति ग्रॅम नोंदवली गेली. मागील सत्रात सोने 47996 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याच वेळी चांदीचा भाव 1233 रुपयांनी किंवा 2.05 टक्क्यांनी वधारला आणि चांदीचा धातू प्रति किलो 61441 रुपये झाला.
स्टॉक मार्केटमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 रुपयांनी कमी होऊन 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे मागील व्यवहारात सोने 47890 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
मात्र, चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून 61,400 रुपये प्रतिकिलो झाला.
दिल्ली 65100
चैन्नई 61400
मुंबई 61100
पुणे 61100
दिल्ली 51,420
चैन्नई 49,590
मुंबई 47,900
पुणे 49,680
ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रतितोळेच्या पुढे गेले होते. येत्या काही महिन्यात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत.
त्यामुळे सोने काही महिन्यात पुन्हा उसळी घेऊन गेल्या वर्षीचा उच्चांक गाठू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.