प्रेयसीचे दोनदा झालं लग्न, प्रेम वेड्या प्रियकराने ते दोन्ही वेळेला तोडलं; अखेर त्रस्त ग्रामस्थांनी उचललं असं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुररुद्र 161 येथील रहिवासी शंकर राय यांचा मुलगा नीरज याचे माश्रक पोलीस स्टेशन हद्दीतील हंसापीर गावातील रहिवासी महेश यादव यांची मुलगी बबिता हिच्याशी प्रेमसंबंध होते.

Updated: Jul 29, 2022, 05:14 PM IST
प्रेयसीचे दोनदा झालं लग्न, प्रेम वेड्या प्रियकराने ते दोन्ही वेळेला तोडलं; अखेर त्रस्त ग्रामस्थांनी उचललं असं पाऊल title=

मुंबई : प्रेमात लोकं काहीही करायला तयार होतात हे तर आपल्याला माहित आहे. प्रेमात लोकं सगळ्या मर्यादा पार करायला तयार होतात, त्यासाठी ते जराही मगेपुढे पाहात नाहीत. असंच काहीसा प्रकार एका तरुणाने केला. जो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या वेड्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी दोन लग्न मोडले. तरुणाच्या या प्रेमाला कंटाळून गावकऱ्यांनी अखेर तरुणीला त्याच्या ताब्यात दिले. हे प्रकरण पनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे एका तरुणाने आपले प्रेम मिळवण्यासाठी असे काही केले की, या अनोख्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

खरे तर तरुणाच्या इच्छेविरुद्ध मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिलं, परंतु तिच्या प्रियकराने कसं-बसं करुन तिचं लग्न मोडलं. हे त्याने एकदा नाही तर दोनदा केलं, ज्यानंतर. मुलिच्या घरच्यांनी यावर पंचायत बसवली ज्यामध्ये मुलीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावण्याचे ठरले गेले.

सोमवारी संध्याकाळी प्रखंड मुख्यालय स्थित ठाकुरबाड़ी मंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुररुद्र 161 येथील रहिवासी शंकर राय यांचा मुलगा नीरज याचे माश्रक पोलीस स्टेशन हद्दीतील हंसापीर गावातील रहिवासी महेश यादव यांची मुलगी बबिता हिच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मशरक येथील एका तरुणाशी तिचे लग्न लावून दिले.

याचा राग येऊन नीरजने प्रेयसीचे सासरचे घर गाठले त्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि सासरच्यांनी बबीताला घराबाहेर हाकलून दिले.

स्थानिकीकरण टाळण्यासाठी बबिताचे वडील तिचा प्रियकर नीरजशी लग्न करण्यास सहमत झाले. मात्र याचदरम्यान तरुणाच्या वडिलांकडून हुंड्याची दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली, ती पूर्ण करण्यास मुलीचे वडील असमर्थ ठरले.

त्यामुळे मग त्यांनी गोपालगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशपूर गावात मुलीचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं, मात्र येथेही तिचा प्रियकर पोहोचला आणि बबिता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. ज्यानंतर तिच्या दुसऱ्या सासरच्या लोकांनी देखील बबीताला घराबाहेर काढलं. ज्यानंतर शेवटी या सगळ्या प्रकाराला कंटाळून बबीताचे वडिल पंचायतीत गेले. ज्यानंतर बबीताचं लग्न तिच्या प्रयकराशी लावून दिलं गेलं.