जगभरातील अनेक गैर-सरकारी संस्था विविध प्रकारचे सर्वेक्षण करत असतात. काही दिवसांपूर्वी जगभरातील देशांमधील उपासमारीच्या परिस्थितीवरील अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या (global hunger index) अहवालाने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताला (India) 107 वं स्थान मिळालं होतं. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान (Pakistan) आणि भारताचा शेजारी नेपाळ (Nepal) यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा गॅलप लॉ अँड ऑर्डर इंडेक्सने (Gallup Law & Order Index) 2021च्या सर्वेक्षणात सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, या सर्वेक्षणानुसार पाकिस्तान हे भारतापेक्षा अधिक सुरक्षित ठिकाण आहे. (Gallup Law & Order Index India ranked 60th of 121 countries)
गॅलप लॉ अँड ऑर्डर इंडेक्स (Gallup Law & Order Index) या सर्वेक्षणात पाकिस्तान (Pakistan) 42 व्या तर भारत (India) 60 व्या क्रमांकावर आहे. दहशतवाद्यांचे (terrorist) सुरक्षित (secure) आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. या देशात अल्पसंख्याक (minority) हिंदू-शीख-ख्रिश्चन धर्मातील मुलींचे खुलेआम अपहरण केले जाते. तर दर महिन्याला दहशतवादी बॉम्बस्फोटांसह हिंसाचाराच्या बातम्या येतात. या सर्व बाबी असतानाही पाकिस्तानला सुरक्षित घोषित केले गेले आहे.
आता या सर्वेक्षणांमध्ये भाग घेणार्या गॅलप लॉ अँड ऑर्डर इंडेक्समध्ये (Gallup Law & Order Index) पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात 122 हून अधिक देशांतील 1,27,000 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हा निकाल जवळजवळ प्रत्येक देशातील सुमारे 1000 लोकांशी बोलून काढण्यात आला आहे. मात्र 130 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात, सर्वेक्षणाचा नमुना आकार 1000 कसा असू शकतो? सर्वेक्षणात सहभागी लोकांची निवड कोणत्या आधारावर आणि कोणी केली, याची माहिती समोर आलेले नाही.
दरम्यान, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत श्रीलंकेच्या (sri lanka) मागे होता. श्रीलंकेत लोकांनी आपल्याच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या घरांना आग लावली होती. नेत्यांना रस्त्यावर मारहाण केली होती. या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. खाण्यापिण्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. देश उद्ध्वस्त झाला पण, ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये (global happiness index) श्रीलंका भारतापेक्षा पुढे आहे. त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत अहवाल जारी केला होता. त्यानुसार भारतात कोरोनामुळे (Corona) मृत्यू झालेल्यांची संख्या 47,29,548 झाली आहे. तर, भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, त्या काळात केवळ 4.8 लाख मृत्यू झाले.
दरम्यान, 2021 च्या गॅलप कायदा आणि सुव्यवस्था निर्देशांकात भारत 121 देशांपैकी 60 व्या क्रमांकावर आहे. सिंगापूर 96 गुणांसह सर्वोच्च स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान 51 गुणांसह यादीत तळाशी आहे. सिंगापूरनंतर ताजिकिस्तान, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि इंडोनेशिया पहिल्या पाचमध्ये होते, तर दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला आणि आफ्रिकेतील सिएरा लिओन, काँगो आणि गॅबॉन या पाच देशांचा समावेश आहे. या अहवालांमधून भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी चर्चा आहे.