Nikki Yadav Case : निक्की यादवची हत्या कशासाठी? पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती समोर

Nikki Yadav Case : सुरुवातीला निक्की यादवने साहिलसोबत लग्न करण्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे त्याने ही हत्या केल्याचे म्हटले जात होते मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.  याप्रकरणी याप्रकरणी आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Updated: Feb 18, 2023, 10:59 AM IST
Nikki Yadav Case : निक्की यादवची हत्या कशासाठी? पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती समोर title=

Nikki Yadav Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील साहिल गहलोत (Sahil Gehlot) याने 24 वर्षीय तरुणाने त्याची लिव्ह इन पार्टनर निक्की यादव (Nikki Yadav) हिचा खून करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या खूनानंतर साहिलने दुसऱ्या तरुणीसह लग्नदेखील केलं होतं. सुरुवातीला निक्की यादवने साहिलसोबत लग्न करण्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे त्याने ही हत्या केल्याचे म्हटले जात होते. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. दरम्यान, याप्रकरणी याप्रकरणी आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

14 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी साहिलच्या ढाब्याच्या फ्रीजमधून निकीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. 9 फेब्रुवारीच्या रात्री साहिलने त्याच्या कारमधील डेटा केबलने निक्कीचा गळा आवळून खून केला होता. यानंतर साहिलने निक्कीचा मृतदेह गाडीच्या पुढील सीटवर ठेवून दिल्लीच्या रस्त्यांवर 40 किलोमीटर फिरत राहिला. यानंतर मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. 10 फेब्रुवारी रोजी घरच्यांच्या इच्छेनुसार साहिलने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले.

निक्की यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल गेहलोत आणि निक्कीचे लग्न ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडा येथील एका मंदिरात झाले होते (Nikki Yadav married Sahil). साहिलचे कुटुंबीय त्यांच्या लग्नावर खुश नव्हते.नाराज असलेल्या साहिलच्या कुटुंबियांना त्याचे लग्न डिसेंबर 2022 मध्ये दुसरीकडे ठरवले. तसेच साहिलने आधीच निक्कीशी लग्न केल्याचे मुलीच्या कुटुंबापासून लपवून ठेवले. त्यामुळे साहिलच्या घरच्यांना त्याच्या निक्कीसोबतच्या लग्नाची माहिती होती.

साहिल गेहलोतने लिव्ह-इन पार्टनर निक्की यादवची दिल्लीत हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने त्याची गुन्ह्याची कबुली दिली होती. आरोपी साहिलने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता हत्येनंतर सुमारे 12 तासांनी दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या दिवशी परत आला आणि निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. हत्येचा कट रचण्यात साहिलसह त्याचे कुटुंबीय आणि त्याचे मित्रही होते. गुन्हे शाखेने साहिलचे वडील वीरेंद्र सिंग, भाऊ आशिष आणि नवीन, मित्र लोकेश आणि अमर यांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचा मित्र आणि चुलत भावाने निक्कीचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यास मदत केली.

आर्य मंदिरात लग्न झाल्याचा खुलासा

साहिल आणि निक्कीचे लग्न ऑक्टोबर २०२० मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात झाल्याचे आता समोर आले आहे. साहिलचे कुटुंब या लग्नामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी निक्कीला कुटुंबापासून बाजूला करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी साहिल आणि निक्कीच्या लग्नाचे प्रमाणपत्रही जप्त केले आहे.