चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशाचा आज निकाल; कोण मारणार बाजी? बहुमताचा आकडा काय? वाचा

4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Updated: May 2, 2021, 08:08 AM IST
चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशाचा आज निकाल; कोण मारणार बाजी? बहुमताचा आकडा काय? वाचा title=

नवी दिल्ली : 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 8 वाजेपासून मतगणना सुरू करणार आहे. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ, पुदुच्चेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाची तयारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतगणना करताना मतमोजणी करताना कोव्हिड 19 च्या मार्गदर्शक तत्वांच पालन करण्यात येणार आहे. एका खोलीत फक्त 7 टेबल ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधी ही संख्या 14 इतकी होती.

बंगालमध्ये CRPFच्या 256 कंपन्या तैनात
पश्चिम बंगालमध्ये 108 मतदान केंद्रांवर सुरक्षेची 3 स्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. ईव्हीएम मशी आणि वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेलला कडक सुरक्षितेत ठेवण्यात आले आहे. राज्यात 292 जागांसाठी मतदान होणार आहे. ममता बँनर्जी यांचा तृणमुल कॉग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होणार आहे.

केरळमध्ये सत्ताधाऱ्यांचा विजयाचा अंदाज
केरळमध्ये 140 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणूकीदरम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांचे कॅबिनेटचे 11 सदस्य, विरोधीपक्षनेता रमेश चेन्नीथला, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ओम्मन चंडी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन, ई. श्रीधरण यांच्यासह 957 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. एक्जिट पोलनुसार सत्ताधारी भारतीय साम्यवादी पक्ष(मार्क्सवादी) पुन्हा विजयी होण्याचा अंदाज आहे

तामिळनाडु मध्ये 234 जागांचा निकाल
तामिळनाडुचे अभिनेता कमल हसनचा मक्कल निधी मैयमसह चार आघाड्या निवडणूकीच्य्या रिंगणात आहेत. परंतु मुख्य सामना सत्तारुढ अन्नाद्रमुक आणि मुख्य विरोधी पक्ष द्रमुक यांच्यात आहे. याशिवाय कन्याकुमारी येथील लोकसभा मतदारसंघाचीदेखील पोटनिवडणुक झाली. त्याचा आज निकाल येणार आहे.

पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये माजी मुख्यमंत्री एन रंगास्वामी नीत ऑल इंडिया एनआर कॉंग्रेस-भाजपा आघाडी आणि कॉंग्रेस - द्रमुक आघाडी यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.

आसाममध्ये भाजप सत्ता टिकवणार का?
आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणुक झाली.  आसामची सत्ता सध्या भाजपकडे आहे. भाजपचा सामना आसाम गण परिषद आणि कॉंग्रेसशी होणार आहे. या ठिकाणी भाजप सत्ता राखणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.