गुगलवर चुकूनही शोधू नका 'या' गोष्टी.. नाहीतर जाल थेट जेलमध्ये; कारण एकदा वाचाच

जर का तूम्ही हे असं केलंच तर तूम्हाला सरळ जेलची हवा खावी लागेल. 

Updated: Jul 15, 2022, 09:54 PM IST
गुगलवर चुकूनही शोधू नका 'या' गोष्टी.. नाहीतर जाल थेट जेलमध्ये; कारण एकदा वाचाच title=

Google Jail: गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. तुम्ही गुगलवर कोणतीही माहिती मिळवू शकता. तुम्हाला फक्त गुगल सर्चवर जाऊन तुमचा प्रश्न विचारायचा आहे ज्याचे एका झटक्यात तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल. एकप्रकारे एका चांगल्या वेगाने ही माहिती आपल्याला देते. जरी काही लोक चुकीची माहिती मिळविण्यासाठी Google वापरू शकत असेल तरी एक जागरूक युझर म्हणून तूम्ही या चार गोष्टी गुगलवर अजिबात सर्च करू नका. आणि जर का तूम्ही हे असं केलंच तर तूम्हाला सरळ जेलची हवा खावी लागेल. 

चाइल्ड पोर्नोग्राफी... 
चाइल्ड पोर्नोग्राफी ही खूप गंभीर समस्या आहे, ज्याबद्दल तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आयटी कायद्यात अशा सर्चवर पूर्ण बंदी आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्हीही असा कोणताही कनटेंट सर्च केला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

बॉम्ब कसे बनवायचे...
अनेक वेळा लोक गंमतीने गुगलवर बॉम्ब बनवण्यासारखे संवेदनशील विषय शोधतात अशावेळी जर तूम्ही सर्च करताना आढळलात तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते कारण हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असते.

दहशतवादी कारवायांबद्दल...
जर तुम्ही गुगलवर दहशतवादी कारवायांशी संबंधित व्हिडिओ आणि कंटेंट सर्च केले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे. सरकार नेहमीच अशा सर्चवर लक्ष ठेवते आणि जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टी गुगलवर सर्च केलेच तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते.

प्रतिबंधित जागेबद्दल शोध...
तुम्ही भारतातील बंदी असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा करण्याचा सतत प्रयत्न करत असाल, तर तुमच्यावर काही कायदेशीर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक सरकार अशा शोधांवर लक्ष ठेवते.