राजकीय दबावासमोर ट्रम्प झुकले, सरकारला निधी पुरवण्याचा करार मान्य

डेमॉक्रेटीक सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Updated: Jan 27, 2019, 12:29 PM IST
राजकीय दबावासमोर ट्रम्प झुकले, सरकारला निधी पुरवण्याचा करार मान्य  title=

वॉशिंग्टन : मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावरून अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात मोठे शटडाऊन सध्या सुरू आहे. ते संपवण्यासाठी तात्पुरत्या कराराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयाला डेमॉक्रॅट सदस्यांनी विरोध केला. या राजकीय दबावासमोर झुकत ट्रम्प यांनी हा करार मान्य केल्याचे सांगितले जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारला निधी पुरविण्याच्या कराराला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला असून अमेरिकन संसद सदस्यांनी स्थलांतरणावर व्यापक करार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या योजनेला दोन्ही सभागृह आणि सिनेटने शुक्रवारी ध्वनिमताने पाठिंबा दिला. आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर मेक्सिको सीमेवरील अवैध मार्ग रोखण्यासाठी भिंत बांधू असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण आता डेमॉक्रेटीक सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

व्हाईट हाऊसचे शेफ संपावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाहेरून पिझ्झा, बर्गर मागवण्याची वेळ

ट्रम्प यांची स्वाक्षरी 

 या कराराला कायद्याचे स्वरुप प्राप्त झाले असून त्यावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिलाय. या तात्पुरत्या करारामुळे फेडरल कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे कर्मचारी पगाराविना काम करीत होते किंवा त्यांच्यावर नोकरी सोडण्याची पाळी आली होती. या निर्णयामुळे विमानसेवा उद्योगावरील ताण कमी झाला आहे.

Image result for trump zee news

व्हाईट हाऊसचे शेफ संपावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाहेरून पिझ्झा, बर्गर मागवण्याची वेळ

 डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या डायनिंग रुममध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज अशा फास्ट फूडची सोय केली आहे. राष्ट्राध्यक्षांनी ही ऑर्डर आपल्या स्वखर्चाने केली आहे. याचे कोणतेही बिल व्हाईट हाऊसच्या नावे नसणार आहे.

राजीनाम्याची अफवा 

'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा', व्हाईट हाऊस बाहेर वाटले गेले वृत्तपत्र

'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा', व्हाईट हाऊस बाहेर वाटले गेले वृत्तपत्र​

 ट्रंप यांच्या राजीनाम्याची बातमी असलेले खोटे वृत्तपत्र वितरीत करण्यात आल्याचे वॉशिंगटन पोस्टने म्हटले आहे. या बनावट वृत्तपत्राशी वॉशिंगटन पोस्टचा कोणताही संबंध नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. या घटनेवर व्हाईट हाऊस आणि ट्रंप यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.