Creative Ideas in Bathroom: आपण किती Creative आहोत हे पाहिलं जातं. Quality पेक्षा Quantity महत्त्वाची आहे असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. आपण जितके क्रिएटिव्ह तितकाच आपला फायदा होत असतो. क्रिएटिव्ह आयडिया येण्याची जागा ही प्रत्येकावर अवलबूंन असते. अनेकदा लोकं म्हणतात की क्रिएटिव्ह आयडिया सर्वात जास्त बाथरूममध्ये येतात. कदाचित तुमच्यासोबतही हे घडत असेल. मग अशा वेळेस असा प्रश्न पडतो की असे का होते?
यावर गेल्या अनेक दशकांपासून संशोधन सुरु आहे. अद्याप यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. पण काही शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधनाने बाथरूममध्ये लोकांचे विचार पूर्णपणे भिन्न का असतात? याविषयी सांगत आहेत तर आज आपण बाथरूममध्ये क्रिएटिव्ह आयडियाज चा जन्म कसा होतो हे पाहणार आहोत. (Do you like these creative ideas in the bathroom See what scientists say nz )
बाथरूममध्ये सर्जनशील कल्पना या विषयावर संशोधन करणारे व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधक जॅक इरविंग यांच्या मते, सर्जनशील आणि पूर्णपणे भिन्न कल्पनांसाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु एखाद्या विषयावर मेंदूचा अतिरेकी वापर केल्याने ते उलट देखील होऊ शकते. आणि चुकीचे परिणाम समोर येऊ शकतात. एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी किंवा काहीतरी नवीन आणि चांगले करण्याचा विचार करण्यासाठी ब्रेक घेणे अत्यंत आवश्यक आहे.
1. बाथरूममध्ये आंघोळ करताना किंवा इतर काम करताना आपले मन पूर्णपणे शांत असते. अशा परिस्थितीत माणूस शांत मनाला ताण न देता विचार करतो. शांत मनाने, एखादी व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने विचार करण्यास सक्षम असते, म्हणून बाथरूममध्ये वेगवेगळे उपाय सापडतात. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय विचार करते तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
2. शास्त्रज्ञ म्हणतात की उन्हाळ्यात डोक्यावर थंड पाणी आणि हिवाळ्यात कोमट पाणी टाकले तर मेंदू अधिक कल्पना निर्माण करू शकतो.
बाथरूममध्ये क्रिएटिव्ह आयडियाज का येतात यावर आतापर्यंत अनेकांनी संशोधने केली आहेत पण खरं कारण अजून ही समोर आलेले नाही. प्रत्येकाच्या कम्फर्टनुसार त्यांना क्रिएटिव्ह आयडियाज येत असतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)