किचनमध्ये झुरळं वाढले; केवळ एक उपाय झुरळं होतील गायब..

आणि पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. त्यानंतर ते झुरळावर शिंपडा. यामुळे झुरळं मारली जातील.

Updated: Oct 18, 2022, 07:31 PM IST
किचनमध्ये झुरळं वाढले; केवळ एक उपाय झुरळं होतील गायब.. title=

मुंबई: आपल्यापैकी खूप जण असतील जे घरात झुरळ असल्याने हैराण झाले असतील (cockroch problem in house). किचन मध्ये झुरळ अक्षरशः धुमाकूळ घालतात. जेवणाचे पदार्थ असो कि किचनमधील भांडी असो सगळीकडे झुरळ फिरत राहतात आणि त्यामुळे आजर्पण येण्याची शक्यता असते. मात्र यावर उपाय आहे काही घरगुती उपाय करून तुम्ही झुरळांवर कायमची मुक्ती मिळवू शकता (home remedies for rid of cockroaches) . 
घरात फक्त झुरळचं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कीटकांमुळे त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय  (home remedies for cockroach problem) तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. झुरळांमुळे घरात घाण तर पसरतेच शिवाय अन्नातून विषबाधा होण्याचाही धोका असतो. अन्नपदार्थांवरील त्यांच्या विष्ठेमुळे अनेक आजार आणि ऍलर्जी होतात.  चला तर मग जाणून घेऊया त्यांना घराबाहेर काढण्याचे कोणते उपाय आहेत.

कडुनिंब 
कडुनिंबाची पानं किंवा त्याचं तेल दोन्ही कीटक मारण्यासाठी प्रभावी आहेत. कडुनिंबाची पानं बारीक करून गाळून पाण्यात मिसळून झुरळ किंवा कीटकांवर फवारणी करावी.  जर तुमच्याकडे कडुनिंबाची पानं नसतील तर तुम्ही कडुनिंबाचं तेल देखील फवारू शकता.

तमालपत्र
झुरळं दूर करण्यासाठी तमालपत्र देखील खूप प्रभावी आहे.  र हिरवी पाने असतील तर त्यांना बारीक करून स्प्रे बनवा आणि जर कोरडी पाने असतील तर ते उकळवून स्प्रे बाटलीत ठेवा. यानंतर झुरळांच्या जागेवर शिंपडा.

काळी मिरी, कांदा आणि लसूण
काळी मिरी, कांदा आणि लसूण यांची पेस्ट तयार करा आणि पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. त्यानंतर ते झुरळावर शिंपडा.  यामुळे झुरळं मारली जातील.

बेकिंग सोडा  
बेकिंग सोडा प्रत्येक घरात असतो आणि तो झुरळांचा शत्रू आहे हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल.  फक्त बेकिंग सोडा साखरेत मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा आणि झुरळं दिसतील तिथे फवारणी करा. (effective remedies for getting rid of cockroaches apply this and cockroaches will gone forever )