राम रहीमचा साथिदार पवन इंसा अटकेत

लैंगिक शोषण केल्या प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम याच्या जवळील सहयोगी असलेल्या पवन इंसा याला अटक करण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 21, 2017, 09:25 PM IST
राम रहीमचा साथिदार पवन इंसा अटकेत title=
Image: ANI

चंडीगढ : लैंगिक शोषण केल्या प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम याच्या जवळील सहयोगी असलेल्या पवन इंसा याला अटक करण्यात आली आहे.

हरियाणा पोलिसांनी पवन इंसा याला पंजाबच्या लालरु येथून अटक केली आहे. पवन इंसा याला हा हरियाणा पोलिसांनी मोस्ट वांटेल घोषित केलं होतं.

पंचकूला पोलीस उपायुक्त मानबीर सिंह यांनी सांगितले की, पवन इंसा याला पंजाबमधील लालरु परिसरातून अटक केली. तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता".

पवन याला हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास दलाने अटक केली आहे. त्याचा एक अन्य साथिदार आदित्य इंसां हा अद्याप फरार आहे.

पवन इंसा याला रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. बाबा राम रहीम याला सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कथित रुपात हिंसा भडकवल्या प्रकरणी पवन इंसा याच्यावर गुन्हा दाखल आहे.