Delhi Metro मध्ये दंगल! वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी घडवली अद्दल; पाहा Video

Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. मेट्रोमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे वाद पेटला पाहुया...

Updated: Oct 24, 2023, 08:26 PM IST
Delhi Metro मध्ये दंगल! वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी घडवली अद्दल; पाहा Video title=
Delhi Metro Viral Video

Uncle beating An guy in Delhi Metro : दिल्ली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कधी किसिंगचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. तर कधी डान्स व्हिडीओ समोर येतो. अशातच आता दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro Fight Video) हाणामारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रवाशी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. शर्टाच्या गुंड्या तुटेपर्यंत तरुणाला मारहाण करता आली होती. नेमकं प्रकरण काय? वाद का झाला? पाहुया...

दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला टोपी घातलेला एक व्यक्ती एका वृद्धाला मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे मेट्रोमधील लोकांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. तरुणाने वृद्धाला मारलं तर प्रवाशांनी वृद्धाची मदत केली. त्यांनी तरुणाला चोप दिला. त्यावेळी उपस्थित अनेकांनी हात साफ करून घेतल्याचं दिसून आलं. पण वाद कसा सुरू झाला?

झालं असं की, वृद्ध व्यक्तीने चुकून तरुणाच्या पायावर पाय दिला होता. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वृद्ध व्यक्तीने माफी देखील मागितली. मात्र, तरुणाने वाद घातल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे. 

पाहा Video

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 48 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 600 हून अधिक लोकांनी लाईक देखील केलाय.

दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी डीएमआरसीने सोमवार ते शुक्रवार 25 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 40 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लोकांना मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करता येईल.