Crime News : श्वानावर लैंगिक अत्याचार; भर रस्त्यात केले नको ते कृत्य

एका नराधमाने भर रस्त्यात श्वानावर लैंगिक अत्याचार केला आहे. एका व्यक्तीने या सर्व घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2023, 04:40 PM IST
Crime News : श्वानावर लैंगिक अत्याचार; भर रस्त्यात केले नको ते कृत्य title=

Delhi Crime News : देशाची राजधानी दिल्लीत एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. नराधमाने एका श्वानावर (Dog) लैंगिक अत्याचार (sexually assaulted) केला आहे. भर रस्त्यात त्याने श्वासनासह नको ते कृत्य केले आहे. नराधमाच्या या अवामानवीय कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने नराधमाचे हे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. यानंतर प्राणी  मित्रांनी श्वानावर अत्याचार करणाऱ्या या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नेमकं काय घडलं?

नोएडातील सेक्टर 12 परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस नराधम श्वासनासह धक्कादायक कृत्य करत होता. तो या श्वानावर लैंगिक अत्याचार करत होता. भर रस्त्यात तो हे कृत्य करत होता. बराच वेळ त्याने या श्वानाला पकडून ठेवले होते. व्हिडिओमध्ये नराधम श्वानावर अत्याचार करताना दिसत आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उघडकीस आला प्रकार?

नराधम श्वानावर अत्याचार करत असताना यावेळी येथे एक इसम उपस्थित होता. यावेळी त्याने हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. त्याने हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

प्राणी मित्र संघटना संतापल्या

नराधमाने श्वानासह केलेले हे कृत्य अत्यंत धक्कादायक आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती देखील तितकाच गुन्हेगार असल्याचा आरोप प्राणी मित्र संघटनानी केला आहे. या व्यक्तीने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याऐवजी  श्वानावर अत्याचार करणाऱ्या नरधामाला रोखायला पाहिजे होते. नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे असे मत प्राणी मित्र संघटनानी व्यक्त केले आहे. 

पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी?

या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी श्वासानावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्राणी मित्र संघटनांनी केली आहे. तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला देखील समज दिली पाहिजे. जेणेकरुन पुन्हा कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असल्यास संबधीत व्यक्तीवर तात्काळ कारवाई होवू शकते. या प्रकरणी तपास करण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आल्याचे  नोएडाचे पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले. ज्या परिसरात ही घटना घडली तेथील संबधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारींना याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी लवकरच कारवाई करून आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासान देखील त्यांनी दिले आहे.