Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला 13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले

दिल्लीमध्ये बोलेरो जीपनं स्कुटीला धडक देऊन तरुणीला पाडलं.  यानंतर तब्बल 13 किलोमीटर तरुणीला फरफटत नेलं गेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. 

Updated: Jan 1, 2023, 08:13 PM IST
Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला  13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले   title=

Delhi Crime News: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक अत्यंत भायनक आणु क्रूर घटना घडली आहे(Delhi Crime News). दिल्लीमध्ये बोलेरो जीपनं स्कुटीला धडक देऊन तरुणीला पाडलं.  यानंतर तब्बल 13 किलोमीटर तरुणीला फरफटत नेलं गेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. 

दिल्लीत घडलेल्या या संताजनक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील कांजवाला इथं एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनानं फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. थर्टी फस्ट अर्थात रविवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगानं पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पोलिसांनी कारचा शोध घेतल्यानंतर ती कार सुलतानपुरी इथं बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना मृत मुलीची स्कूटीही सापडली आहे.  अपघातानंतर स्कूटीवर जाणारी तरूणी वाहनाच्या चाकात अडकून वाहन तिला लांबपर्यंत ओढत नेल्याचं आढळून आले. दिल्लीतील निर्भयाकांडानं सारा देश हादरून गेला होता. दिल्लीत तरूणी असुरक्षित असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. 

या मुलीचा मृत्यू हा अपघातामुळे झाला आहे. मात्र, तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने तिच्या बलात्कार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी असा प्रकारचे वृत्त फैलावणाऱ्यांना चांगलाच इशारा दिला आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कारमध्ये या मुलांनी लाऊड म्युझीक लावते होते. गाण्याच्या आवाजामुळे अपघातग्रस्त मुलीचा आवाज आला नाही. यामुळे बलात्काराच्या  खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.