ही मुलगी नाही सून आहे, सासऱ्यासाठी धोका पत्करत थेट हॉस्पिटल गाठतेय...

सून कधी मुलगी होवू शकत नाही असं म्हटलं जातं, पण या सुनेने, सून देखील मुलगी होवू शकते आणि वडिलांप्रमाणे सासऱ्यांवर प्रेम करु शकते  

Updated: Jun 4, 2021, 03:02 PM IST
ही मुलगी नाही सून आहे, सासऱ्यासाठी धोका पत्करत थेट हॉस्पिटल गाठतेय... title=

गुवाहाटी : कोरोनाच्या काळात आपल्या जवळच्यांना हात लावायला काय, तर त्यांच्याशी लांबून संपर्क ठेवायलाही कुणी तयार नाहीय. हवेतून कोरोनाचे विषाणू पसरतात म्हणून प्रत्येक जण आपल्यांपासून अंतर ठेवून आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यातून सख्या भावा-बहिणीला आईवडिलांना, सासू सासऱ्यांना रस्त्यावर सोडून दिले, कोव्हिड सेंटरमध्ये पाहायलाही आले नाहीत, मृतदेहावर संस्कार करायलाही जवळचे पोहोचले नाहीत, अशा घटना घडल्या आहेत.

कोण म्हणतं सूनबाई मुलगी होवू शकत नाही?
पण गुवाहाटीतील या सूनबाई आपल्या कोरोनाबाधित सासऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी वाहन मिळालं नाही, म्हणून आपल्या ७५ वर्षाच्या सासऱ्याला थेट पाठीवर घेतलं आणि हॉस्पिटल गाठलं आहे. ही महिला नात्याने सूनबाई आहे. या सूनेबाईंचं नाव आहे निहारिका, तर सासऱ्यांचं नाव आहे  थुलेश्वर. निहारिका यांचे पती सुरज कामासाठी घरापासून दूर असतात. पण या सूनबाई मुलाचं कर्तव्य देखील पार पाडताना दिसत आहे. 

सून कधी मुलगी होवू शकत नाही असं म्हटलं जातं, पण या सुनेने, सून देखील मुलगी होवू शकते आणि वडिलांप्रमाणे सासऱ्यांवर प्रेम करु शकते आणि त्यांची काळजी घेऊ शकते आणि धोका देखील पत्करु शकते हे सिद्ध केलं आहे. सासऱ्यांना कोरोना झाल्याचं कळताचं, निहारिका यांनी कोणताही विचार न करता स्वतःचं जीव धोक्यात टाकून सासऱ्यांच्या उपचारासाठी रस्त्यावर धावते. त्यानंतर निहारिका यांना देखील कोरोनाची लागण झाली. 

रूग्णालयात पोहोचल्यानंतर सासऱ्यांना कोव्हिड रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर निहारिका यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. पण मी सासऱ्यांना एकट्यांना सोडून जाणार नाही. असं डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना रूग्णवाहिकेने भोगेश्वरी फुकानानीसिव्हिल रूग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करून दिली.