Corona Effect : या 2 ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज

कोरोनाचा कोणत्या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांना अधिक धोका असतो. जाणून घ्या... 

Updated: Jun 4, 2021, 02:56 PM IST
Corona Effect : या 2 ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीचा एक ब्लड ग्रुप असतो. पण कोरोना विषाणूचा प्रभाव देखील काही विशिष्ट ब्लड ग्रुपच्या लोकांवर अधिक झाल्याचा तर काही लोकांवर कमी झाल्याचं वैज्ञानिकांचा दावा आहे. संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे ट्रांसफ्यूजन मेडिसिन विभागाचे प्रा. अतुल सोनकर यांनी सांगितलं की, एबी आणि बी ब्लड ग्रुपच्या लोकांनी कोरोना विषाणूपासून अधिक सावध राहण्याची आवश्यकता असते. या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होतो. ओ ब्लड ग्रुपच्या लोकांवर व्हायरस जास्त प्रभाव होत नाही. होम आयसोलेशनमध्ये हे रुग्ण बरे झालेत.

प्रा. सोनकर यांच्या मते काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चने एका संशोधनात म्हटलं की, AB आणि B ब्लड ग्रुपच्या लोकांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. O ब्लड ग्रुपच्या लोकांवर याचा कमी प्रभाव झाला आहे. या लोकांमध्ये खूप सौम्य लक्षणं दिसत आहेत.

सीरो पॉझिटिव्ग सर्वेच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. यामध्ये देशातील 10 हजार लोकांचा डेटा घेतला गेला. 140 डॉक्टर्सने यावर विश्लेषण केलं. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं की, शाकाहारी लोकांपेक्षा मासांहारी लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. 

प्राध्यापक सोनकर यांच्या मते, 'हे सगळं व्यक्तीच्या जेनेटिक स्ट्रक्चरवर अवलंबून असतं. थॅलेसीमियाशी पीडि़त व्यक्तींना कदाचितच मलेरिया होतो. काही उदाहरणं असे देखील आहेत ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला. पण एकच व्यक्ती वाचला. याचं कारण आहे- जेनेटिक स्ट्रक्चर.'

ओ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींची इम्यून सिस्टम या व्हायरसच्या विरोधात एबी आणि बी ग्रुपच्या लोकांमध्ये अधिक मजबूत असू शकते. पण रिसर्चचा अर्थ असा नाही की, ओ ग्रुपच्या लोकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करु नये आणि बिनधास्त राहावं. हे फक्त सॅम्पल सर्वे आहे. वैज्ञानिकदृष्टीकोनातून हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये वेगवेगळं संक्रमण का होते यावर संशोधन सुरु आहे.