सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : अरबी समुद्रात वायु चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. गुजरातच्या सौराष्ट्र पोरबंदरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे.
वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. नेमकं हे वायू आधार कशा पद्धतीने पुढे सरकतोय किती मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहे हे तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर windy.com वेबसाईट वरती क्लिक केल्यावर थेट दृश्य तुम्ही पाहू शकतात.
दरम्यान, वायू वादळ शमल्यानंतर राज्यात मान्सून वेगाने सक्रीय होणार आहे. मान्सूनला ही स्थिती स्थिरावण्यासाठी योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात १३ ते १४ जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.