अरे बापरे ! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात 700 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत आतापर्यंत देशातील 776 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (776 doctors died in Covid second wave)  

Updated: Jun 25, 2021, 08:55 PM IST
अरे बापरे ! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात 700 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू title=

मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत आतापर्यंत देशातील 776 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (776 doctors died in Covid second wave) इंडियन मेडिकल असोसिएशनने Indian Medical Association (IMA) याबाबत माहिती दिली आहे. सर्वाधिक 115 डॉक्टरांचा मृत्यू बिहारमध्ये झाला आहे. तर त्यापाठोपाठ दिल्ली मध्ये 109 डॉक्टरांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत 23 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. (776 doctors died in Covid second wave, says Indian Medical Association)  

कोविडच्या दुसर्‍या लाटात 776 डॉक्टरांनी आपला जीव गमावला.  बिहारमध्ये सर्वाधिक 115 मृत्यू तर दिल्लीनंतर, उत्तर प्रदेश 79, पश्चिम बंगाल 62, राजस्थान 44, झारखंड 39, आणि आंध्र प्रदेश 40 अशी नोंद झाली आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी माहिती दिली.

आयएमएच्या म्हणण्यानुसार,  कोरोनाच्या पहिल्या लाटेत 748 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला. दक्षिणेकडील राज्यांत कर्नाटकमध्ये 9 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर केरळमध्ये 24 आणि तामिळनाडूमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेत ओडिशामध्ये 34 डॉक्टरांचा मृत्यू झाला तर महाराष्ट्रात 23 डॉक्टरांचा मृत्यू झाला. शुक्रवारी देशात नवीन कोविड -19च्या प्रकरणांमध्ये किंचित घट दिसून आली असून 51,667  लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.  देशात आता कोरोना रुग्णांचा आकडा 3,01,34,445 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात एकूण 64,527 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 2,91,28,267 लोक बरे झाले आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x