Gyanvapi Case: ज्ञानव्यापी प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, हिंदू पक्षाच्या बाजुने कोर्टाचा निकाल

वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणी जिल्हा कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा निकाल दिला. 

Updated: Sep 12, 2022, 02:42 PM IST
Gyanvapi Case: ज्ञानव्यापी प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, हिंदू पक्षाच्या बाजुने कोर्टाचा निकाल title=

Gyanvapi Case : वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने सोमवारी मोठा निकाल दिला. शृंगार गौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने सुनावणी योग्य मानली आहे. ज्ञानवापी संकुलात असलेल्या शृंगार गौरीसह इतर धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. पण हे प्रकरण न्यायालयात टिकवून ठेवता येत नाही, असा युक्तिवाद करत मुस्लीम बाजूने ही याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत होऊ शकते. त्यामुळे मुस्लमी पक्षाची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.

'हा हिंदू समाजाचा विजय आहे. पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी आहे. ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.' असं ज्ञानवापी मस्जीद प्रकरणातील याचिकाकर्ते सोहन लाल आर्य यांनी म्हटलं आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर हिंदू पक्षाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.