देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असला तरी मृत्यूदर जास्त आहे. 

Updated: Apr 12, 2020, 09:31 AM IST
देशात  २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ९०९ ने वाढली आहे. तर ३४ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. 

...तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही- अजित पवार

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता ८,३५६ इतका झाला आहे. तर एकूण २७३ लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आगामी काळात कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरात रॅपिड टेस्ट करण्याचा सरकारचा इरादा आहे. मात्र, या टेस्टसाठी लागणारी किटस् अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. आतापर्यंत केंद्र सरकारला अडीच लाख लाख किटस् मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागू शकतो.

कोरोना व्हायरस : सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत

इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असला तरी मृत्यूदर जास्त आहे. देशात समूह संक्रमण सुरु झाल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबई हे देशातील कोरोनाच्या प्रसाराचे मुख्य केंद्र झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत १,८३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १,१४६ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दादर, धारावी आणि वरळी हे परिसर सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.