सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत

Updated: Jan 11, 2022, 01:41 PM IST
सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी  title=

दिल्ली :  राजधानी दिल्लीत कोरोनाने कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत आजपासून दिल्लीतील खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहणार असून कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. यासह, रेस्टॉरंट आणि बार इत्यादी देखील बंद राहतील. होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील.

डीडीएमएची नवीन मार्गदर्शक तत्त्वं
दिल्ली विकास प्राधिकरणाने नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार  दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये जी अत्यावश्यक सेवेत ये नाहीत ती पूर्णपणे बंद राहतील. तिथले काम वर्क फ्रॉम होम या नियमानुसार होईल. केवळ अत्यावश्यक सेवांशी जोडलेली कार्यालयं सुरू राहतील.

आजपासून सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार आहेत. म्हणजे हॉटेलमध्ये बसून जेवण करता येणार नाही. असं असलं तरी रेस्टॉरंटना होम डिलिव्हरी आणि टेकवे सेवा देणे सुरू ठेवण्याची परवानगी असेल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 
जर एखादी व्यक्ती नियमांचं उल्लंघन करताना आढळली, तर तो आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51-60 आणि आयपीसीच्या कलम 188 नुसार दोषी असेल आणि या कलमांखाली त्याच्यावर कारवाई केली जाईल.